झेडपी अध्यक्ष आरक्षण सोडतीला राज्यपालांची परवानगी  

raj.jpg
raj.jpg

पुणे : राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षासाठीची आरक्षण सोडत काढण्यास राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार ही सोडत तात्काळ काढण्याचा आदेश कोशियारी यांनी ग्रामविकास विभागाला दिला आहे.

यानुसार ग्रामविकास विभागाने यासाठी येत्या मंगळवारचा (ता. १९) मुहूर्त काढला आहे. राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्या उपस्थितीत ही सोडत काढली जाणार आहे.           राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर या आरक्षण सोडतीबाबत ग्रामविकास विभाग संभ्रमात पडला होता. त्यामुळे त्यांनी आठवडाभरापुर्वीच याबाबत अजय मेहता याबाबत मार्गदर्शन मागविले होते.

दरम्यान, राज्यातील अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्हा परिषदांच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मुदतवाढीला सर्वोच्च न्यायालयाने नकार देत, तत्काळ निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार या चार जिल्हा परिषदांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडत ही डिसेंबरऐवजी तत्काळ काढण्याचा आदेश राज्यपालांनी दिला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार येत्या १५ डिसेंबर रोजी होणार होती.

येत्या मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता मंत्रालयातील सातव्या मजल्यावर काढली जाणार आहे. या सोडतीला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com