
Maharashtra CM Devendra Fadnavis announces central approval for Bhagwangad development with PM Modi’s support, allocating 4 hectares of forest land for temple facilities.
esakal
Summary
या जमिनीवर भक्तांसाठी सेवा सुविधा, रुग्णालय आणि प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहेत.
केंद्र सरकारने यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडाचा कायापालट लवकरच होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता त्याला आता यश आले आहे. गडावरील विकास कामांसाठी वन विभागाची चार हेक्टर जमीन देण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. यामुळे भगवान गडाच्या विकासास चालना मिळणार आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्ट द्वारे माहिती दिली आहे.