उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही भाजप सत्ता पालट करेल - भागवत कराड

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमुळे जनतेचे नुकसान होत आहे. बेबंदशाही माजली आहे. विकास होत नाही.
dr-bhagwat-karad
dr-bhagwat-karadsakal

औरंगाबाद : चार राज्यांतील भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेनी टाकलेला विश्‍वास आहे. याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही भाजपचे कार्यकर्ते राज्यात सत्ता पालट करतील अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी दिली. डॉ. कराड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून देशाचा विकास झाला आहे. सर्वसामन्यांचा विचार करुन वेगवेगळ्या योजना राबविण्यात आल्या. यातून सर्वसमान्यांना सक्षम करण्याचे काम झाले. त्याचीच प्रचिती आजच्या निकालावरून आली आहे. अनेक राज्यात भाजपने (BJP) बहुमत मिळवले आहे. महाराष्ट्रातही सत्ता पालट होणे गरजेचे आहे. (Bhagwat Karad Says, BJP To Be Change Power Equation In Maharashtra)

dr-bhagwat-karad
मोदींच्या नेतृत्वातील सर्व समावेशक विकासावर जनतेची मोहर : नितीन गडकरी

राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे बघून शिवसेनेला मते दिली होती. जनतेचा विश्‍वास घात करीत तीन पक्षांनी सत्ता स्थापन केली. यामुळे आता सत्तापालट होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) महाविकास आघाडी सरकारमुळे जनतेचे नुकसान होत आहे. बेबंदशाही माजली आहे. विकास होत नाही. म्हणून सत्ता बदलाची गरीज आहे. ती लवकर होईल, असेही डॉ.कराड यांनी सांगितले.

dr-bhagwat-karad
अबब भाजपा ! कुठलाही अलंकार व्याकरण कमी पडतयं : पंकजा मुंडे

गोव्यात पहिल्यांदाच आल्या २० जागा

पहिल्यांदाच गोव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली गोवात पहिल्यांदाच भाजपच्या २० जागा आल्या. स्पष्ट बहुमत मिळत भाजपची सत्ता आली आहे. गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीस यांनी काम पाहिले. त्यांनी योग्य नियोजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास आणि हे योग्यरित्या जनसामान्यापर्यंत पोहोचवित गोव्यात भाजपचे ताकद वाढवली. यामुळेच या राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेशात जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठेवलेला विश्‍वास आणि केलेल संघटन आणि केलेले विकास कामांमुळे या राज्यासह सगळीकडे पुन्हा सत्ता आली. ती बहुमताने आली. असेही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com