अबब भाजपा ! कुठलाही अलंकार व्याकरण कमी पडतयं : पंकजा मुंडे | Pankaja Munde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंकजा मुंडे

अबब भाजपा ! कुठलाही अलंकार व्याकरण कमी पडतयं : पंकजा मुंडे

मुंबई : अबब भाजपा... कुठलाही अलंकार व्याकरण कमी पडत आहे. काम आणि विकास, राष्ट्राभिमान एवढा विषय महत्त्वाचा आहे, लोकांच्या साठी हे सिद्ध झाले. अभिनंदन.. अभिनंदन, या शद्बांमध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पाच राज्यांपैकी चार राज्यातील विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकल्यानंतर ही प्रतिक्रिया ट्विट करुन दिली आहे. आज गुरुवारी (ता.दहा) उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे. (Pankaja Munde Congratulating BJP For Winning UP, Manipur, Goa, Uttarakhand Elections)

हेही वाचा: UP Poll Results : निकालादरम्यान तणावपूर्ण स्थिती; बसपा कार्यकर्त्याला हार्टअटॅक!

या विजयामुळे भाजपचे (BJP) कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) स्पष्ट बहुमत मिळवित काँग्रेसचा पराभव केला आहे. या निकालामुळे भाजपचा आणखीन आत्मविश्वास वाढेल असे बोलले जात आहे.

Web Title: Pankaja Munde Congratulating Bjp For Winning Up Manipur Goa Uttarakhand Elections

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top