

Summary
वादाच्या भरात प्रदीपने विटेचा तुकडा घेऊन वडिलांच्या डोक्यात प्राणघातक वार केला.
जास्त रक्तस्त्रावामुळे पुरुषोत्तम यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी प्रदीप कुंभलवारला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने वडिलांची डोक्यात वीट घालून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून लेकाने केलेल्या हल्ल्यात पुरुषोत्तम विश्वनाथ कुंभलवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी प्रदीप कुंभलवार याला ताब्यात घेतले आहे.