
शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विधानसभा निवडणुकीच्या आधीचा असल्याचं म्हटलं जात आहे. त्या व्हिडीओवरून आता विरोधकांकडून भरत गोगावले यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केलीय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भरत गोगावले यांच्या घरातील अघोरी पूजेवर प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही कृती आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय.