rahul gandhi and bhimrao ambedkar
rahul gandhi and bhimrao ambedkarsakal

Mumbai News : नेहरू आणि आंबेडकरांच्या वारसांची ऐतिहासिक भेट

भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या ‘चैत्यभूमी’वर झाला. सुरुवातीला केवळ बाबासाहेबांच्या अभिवादनापुरता मर्यादित असलेल्या या कार्यक्रमात दोन गोष्टींचा समावेश करण्यात आला.

मुंबई - भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या ‘चैत्यभूमी’वर झाला. सुरुवातीला केवळ बाबासाहेबांच्या अभिवादनापुरता मर्यादित असलेल्या या कार्यक्रमात दोन गोष्टींचा समावेश करण्यात आला. या निमित्ताने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतू आणि पहिले कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अर्थातच राहुल गांधी आणि भीमराव आंबेडकर एकत्र येण्याचा योग घडून आला.

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप चैत्यभूमीवर झाला. याच्या नियोजनाची जबाबदारी काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. चैत्यभूमीचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हत्तीअंबीरेंच्या नेतृत्वात मुंबई काँग्रेसची एक टीम तीन दिवस काम करत होती. चैत्यभूमीच्या कार्यक्रमात चैत्यभूमी ट्रस्टचे अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांची उपस्थिती आवश्यक होती.

मात्र, १५, १६ मार्चला ते धार्मिक कार्यक्रमानिमित्त लखनौच्या दौऱ्यावर गेले होते; पण चैत्यभूमीवर उपस्थित राहण्याची विनंती हत्तीअंबीरे यांनी त्यांना केली. याला मान देत भीमराव आंबेडकर १५ मार्चला मुंबईत परतले. राहुल गांधी चैत्यभूमीवर दाखल झाल्यानंतर त्यांचे स्वागत भीमराव आंबेडकर यांनीच केले. या वेळी समता सैनिक दलातर्फे राहुल गांधींना मानवंदनाही देण्यात आली.

जे जे लोक देशाची लोकशाही, बाबासाहेबांनी दिलेले संविधान वाचवण्यासाठी काम करताहेत त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आमचे धोरण आहे. राहुल गांधी यांना मी संविधानाची प्रत भेट दिली.

- आनंदराज आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू

जवाहरलाल नेहरू आणि पहिले कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस एकत्र आले. चैत्यभूमीसारख्या पवित्र भूमीवर त्यांची भेट व्हावी, याचे वेगळेच समाधान आहे.

- सिध्दार्थ हत्तीअंबीरे, प्रदेशाध्यक्ष (एससी) विभाग, काँग्रेस

कार्यक्रमाची वेळ वाढवली

चैत्यभूमीवर केवळ अभिवादनाचाच कार्यक्रम घेण्यास ट्रस्टने परवानगी दिली होती; परंतु, सहा हजार किमीच्या यात्रेचा शेवट काही मिनिटांत करणे यात्रेच्या आयोजकांना योग्य वाटत नव्हते. याठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन होणे महत्त्वाचे आहे, हत्तीअंबीरे यांनी ट्रस्टला पटवून दिले. अखेर संविधान वाचन आणि राहुल गांधींचे भाषण त्यामुळे चैत्यभूमीवरील हा कार्यक्रम ३० ते ३५ मिनिटांचा झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com