अखेरच्या क्षणी शिवसेना, राष्ट्रवादीची कॉंग्रेसला साथ नाही: Bharat Jodo Yatra Finale Congress Rahul Gandhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra Finale

Congress: अखेरच्या क्षणी शिवसेना, राष्ट्रवादीची कॉंग्रेसला साथ नाही

श्रीनगरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेचा शेवट केला. यावेळी बर्फवृष्टी होत असतानाच राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मात्र, या अखेरच्या क्षणी काही पक्षांनी त्यांच्या साथ सोडली. (Bharat Jodo Yatra Finale Congress Rahul Gandhi)

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या समारोपाला एकूण २३ पक्षांना आमंत्रित केले होते. पण काही पक्षांनी त्यांचे आमंत्रण डावललं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. केवळ ८ चं पक्षांना समारोपाला हजेरी लावली.

भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

इंडियन एक्सप्रेस रिपोर्टनुसार, कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी २३ पक्षाच्या प्रमुखांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र, काही नेत्यांनी श्रीनगर येथील कार्यक्रमात भाग घेतला.

कॉंग्रेसला आशा होती की ज्या पक्षांना आमंत्रित केले आहे. ते सर्व शेर-ए-कश्मीर क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभाही होतील. स्वतः नाही तर त्यांचे प्रतिनिधी पाठवतील अशी अपेक्षा होती. पण तसे काहीच घडले नाही.

भारत जोडो यात्रेला बिहारमधील दोन राजकीय पक्षांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय राहिला. बिहारमध्ये सत्ताधारी जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) हे दोन्ही पक्ष श्रीनगरमध्ये पोहोचले नाहीत. त्यांचे नेतेही या यात्रेत सहभागी झाले नाहीत. विशेष म्हणजे बिहारमधील महाआघाडी सरकारमध्ये जेडीयू आणि आरजेडी काँग्रेससोबत आहेत.

या यात्रेत अनेक पक्षातील नेते सहभागी झाले. या यात्रेला राष्ट्रवादी, शिवसेना, जेएमएम, डीएमके यांची साथ मिळाली होती. महाराष्ट्रात आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे राहुल गांधीसोबत चालले. इतकेच नव्हे तर जम्मू काश्मीरमध्ये खासदार संजय राऊत सहभागी झाले होते. मात्र, श्रीनगर येथे समारोपाला यापैकी कोणीही हजर राहिले नाही. त्यामळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.