सिर पर सम्मान है महाराष्ट्र का! सत्कारानंतर राहुल गांधीकडुन पगडीचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi and nana Patole

भारत जोडो पद यात्रेदरम्यान अर्धापूर नांदेड येथे कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घालुन दिली.

सिर पर सम्मान है महाराष्ट्र का! सत्कारानंतर राहुल गांधीकडुन पगडीचा सन्मान

कऱ्हाड - भारत जोडो पद यात्रेदरम्यान अर्धापूर नांदेड येथे कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घालुन दिली. त्यावेळी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी फुले पगडी देवुन राहुल गांधींचा सन्मान केला. त्यानंतर गांधी यांनी सिर पर ये सिर्फ 'फेंटा' नहीं है...सम्मान है महाराष्ट्र का और इस सम्मान को मैं सदा सिर-आंखों पर रखूंगा...कभी झुकने नहीं दूंगा। असे व्टीट करुन त्या सत्काराला दाद दिली.

कॉंग्रेस नेते राहूल गांधी भारत जोडो पदयात्रेनिमित्त विविध समाज घटकांशी संवाद साधत आहेत. त्याअंतर्गत त्यांना नांदेडमध्ये कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष माळी, ओबीसी विभागाचे विजय राऊत (नाशिक), राहुल पिंगळे (ठाणे) ,जी पी पाटील (नांदेड), राजेंद्र राख, मयूर वांद्रे, विजय देवडे, गौरव वाघ, मिलिंद चित्ते, महेश गायकवाड, कुलदीप वानखेडे, मयूर मोटकरी आदींशी संवाद साधला. त्यावेळी सेलचे प्रदेशाध्यक्ष माळी यांनी फुले पगडी देवुन राहुल गांधींचा सन्मान केला. त्यादरम्यान फुले - शाहू- आंबेडकर यांचे विचारच देशाला वाचवू शकतात असे उद्गार गांधी यांनी काढले.

माळी यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना व कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन या दोन प्रमुख मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. त्यावर गांधी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या मेनीफेस्टोमध्ये या दोन प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात येईल असे अश्वासन दिले. लोकसभा निवडणूकी पूर्वी पुणे येथे ओबीसींच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून सदर मेळाव्यास राहुल गांधी यांनी करण्यात आली. ती त्यांनी मान्य केली. त्यानंतर गांधी यांनी सिर पर ये सिर्फ 'फेंटा' नहीं है...सम्मान है महाराष्ट्र का और इस सम्मान को मैं सदा सिर-आंखों पर रखूंगा...कभी झुकने नहीं दूंगा। असे व्टीट करुन त्या सत्काराला दाद दिली.