"अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका; राज्य सरकारने त्वरीत मदत करावी" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Bharati Pawar

"अवकाळी पावसाचा मोठा फटका; राज्य सरकारने त्वरीत मदत करावी"

गेल्या ७ मार्चपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. सुरवातीला उत्तर महाराष्ट्र त्यानंतर कोकणात अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसाने नाशिकमधील द्राक्ष बागा, कोकणाती आंबा व काजू बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले. याशिवाय राज्यातील विविध भागात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.

यातच आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अवकाळी पावसाने नाशिकमधील द्राक्ष बागा, गहू, कांदा आणि मका या नुकसान झालेल्या पिकांचा आढावा घेतला. यासंदर्भात त्यांनी माहिती देताना सांगितले, “मी काही शेतांमध्ये वयक्तिकरित्या परिस्थिती पाहिली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकरात लवकर पंचनामा करावा आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी.”

हेही वाचा: "..तर मविआला योग्य धडाही निश्चितच शिकवू, हे नीट लक्षात ठेवा!"

पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी. पंचनामा करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत पुरवावी. तसेच या संदर्भात राज्य सरकारने त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी सुद्धा डॉ. भारती पवार यांनी केली.

Web Title: Bharati Pawar Demanded Panchnama Be Done And Farmers Be Given Necessary Help At The Earliest

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top