"..तर मविआला योग्य धडाही निश्चितच शिकवू, हे नीट लक्षात ठेवा!"

bjp Chandrakant patil warns mva government over   police sending notice to devendra fadnavis
bjp Chandrakant patil warns mva government over police sending notice to devendra fadnavis esakal

देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी बदल्यांतील घोटाळाप्रकरणी बजावलेल्या नोटीसीमुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना पोलिसांनी (Mumbai Police) पाठवलेल्या नोटीसबद्दल भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी, हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. तसेच मविआ सरकार मनमानी करताना आम्ही मात्र लोकशाही मूल्यं जपतो असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील ट्विट करत याचा चांगलाच समाचार घेतला आहे,विरोधी पक्षनेते म्हणून असलेल्या विशेषाधिकारांबाबत या सरकारला, राजशिष्टाचार विभागाला काहीच माहिती नाही का, की कायदे पाळायचेच नाहीत? असा संतप्त सवाल केलाय. त्यांनी पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बदल्यांतील घोटाळाप्रकरणी CRPC 160 अन्वये दिलेली नोटिस म्हणजे, चोर सोडून संन्याशाला… असा प्रकार आहे. असे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून असलेल्या विशेषाधिकारांबाबत या सरकारला, राजशिष्टाचार विभागाला काहीच माहिती नाही? की कायदे पाळायचेच नाहीत? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

bjp Chandrakant patil warns mva government over   police sending notice to devendra fadnavis
दोन वर्षांनंतर PM नरेंद्र मोदी आईच्या भेटीला; सचिन सावंत म्हणतात..

पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "विशेषाधिकार असूनही चौकशीसाठी जाण्याच्या, प्रश्नांना उत्तरं देण्याच्या देवेंद्रजींच्या भूमिकेचं स्वागत करतो. मविआ सरकार मनमानी करताना आम्ही मात्र लोकशाही मूल्यं जपतो, हेच यातून स्पष्ट होतंय. मुंबईनंतर पुणे पोलिसांनीही अशीच नोटिस काढल्याचं समजतंय. अरे, तुम्ही असं सत्य झाकू शकाल?' असा सवालही त्यांनी केलाय.

bjp Chandrakant patil warns mva government over   police sending notice to devendra fadnavis
नोकरदारांना मोठा झटका, EPFO ​​ने कमी केले व्याजदर; वाचा सविस्तर

ते पुढे म्हणाले की, "प्रकरण मा. न्यायालयानं CBI कडे सोपवल्यावरही मविआ देवेंद्रजींना चौकशीच्या फेऱ्यांत अडकवू शकेल? किती बौद्धिक दिवाळखोरी? आम्ही लोकशाहीसाठी सहकार्य करू तसंच रस्त्यावरही उतरू. चौकशीसाठी बोलावून देवेंद्रजींना नाहक त्रास दिला, तर मविआला योग्य धडाही निश्चितच शिकवू, हे नीट लक्षात ठेवा!", असा इशारा देखील त्यांनी य़ावेळी दिला आहे.

पोलिसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यासंबंधी फडणवीस यांना मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी शुक्रवारी नोटीस (Notice) बजावली. त्यानुसार, फडणवीस हे रविवारी बीकेसीच्या सायबर पोलिस ठाण्यात जबाब नोंदविणार आहेत. फडणवीस यांनी 23 मार्च 2021 रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्‍त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.

bjp Chandrakant patil warns mva government over   police sending notice to devendra fadnavis
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पाहा देशातील पेट्रोल, डिझेलचे दर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com