
Bhaskar Jadhav : आरोपानंतर मोहित कंबोज यांना भास्कर जाधव यांचं खुलं आव्हान
Bhaskar Jadhav News: भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना त्यांच्या गटात सामील होण्यासाठी १०० कॉल केले होते असा आरोप केला होता.
मोहित कंबोज यांच्या आरोपांना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. '१०० बापांची पैदास नसेल, तर त्याने एक तरी आरोप सिद्ध करावा, असं आव्हान भास्कर जाधव यांनी मोहित कंबोज यांना दिलेलं आहे.
आज विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी भास्कर जाधव यांनी मोहित कंबोज यांच्या आरोपानंतर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भास्कर जाधव म्हणाले, 'राज्यातील सभ्यपणाचं राजकारण संपत चाललं आहे.
व्यक्तीगत कोणी बोलू नये असं माझं मत आहे'. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चांगलं नेतृत्व म्हणून पाहत होतो. परंतु ते भयंकर सुडाचे राजकारण करणारी व्यक्ती आहेत. वास्तविक असे आरोप होतात, त्या व्यक्तीने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, असे जाधव यावेळी म्हणाले आहेत.
'काल मी येथे वक्तव्यं केलं आणि काल लगेचच मोहित कंबोज जे देवेंद्र फडणवीस यांचं फ्रंट मँन म्हणून काम करतात. त्यांनी आरोप केले की शिंदे यांच्या पक्षात घेण्यासाठी पत्र लिहिलं होतं. १०० बापांची पैदास नसेल तर त्याने एक तरी आरोप सिद्ध करावा, असे भास्कर जाधव यावेळी म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देताना भास्कर जाधव म्हणाले, ' फडणवीस यांनाही आव्हान आहे की , फडणवीस यांना आव्हान आहे की तुमच्याकडे सर्व यंत्रणा आहेत तुमच्याकडे मस्ती देखील आहे.
अशी तपास यंत्रणा लावा आणि मी ५ जरी फोन केला असेल तरी मी राजकारणातून संन्यास घेईल. माझ्या आयुष्यात काही पक्ष सोडण्याची वेळ आली, ती माझ्या मनात सल आहे'.
'आता मी येथे अभिमानाने काम करतो आहे. त्यामुळे मोहित कंबोज आणि त्याला काम सांगणारे अनाजी पंत यांनी आरोप सिद्ध करुन दाखवावे. मला सभागृहात बोलून देत नाही या सत्ताधाऱ्यांना माहित आहे की मी सभागृहात बोलायला लागलो तर काय काय बोलेन.
जर मला सभागृहात संधी मिळाली नाही तर मी तुमच्यासमोर येऊन बोलेन. मी यांना घाबरणार नाही. कोण आहे हा मोहित कंबोज ही पाळलेली भटकी कुत्री आहेत. माझ्याकडे नीतिमत्ता आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.