Video : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठेवलं डोकं, जोडले हात, फिरले माघारी; भास्कर जाधवांनी सांगितलं कारण

Bhaskar Jadhav returned from Legislative Assembly steps Maharashtra Budget session 2023 watch video
Bhaskar Jadhav returned from Legislative Assembly steps Maharashtra Budget session 2023 watch video

मुंबई येथे सध्या राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे गाजत आहेय यादरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव हे आहे विधीमंडळ सभागृहाच्या पायऱ्यांवर डोक ठेवून परत फिरल्याचा प्रकर समोर आला आहे. भास्कर जाधव यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पण त्यांनी असं का केलं याबद्दल चर्चा सुरू असताना भास्कर जाधव यांनीच याबद्दलचा खुलासा केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, भास्कर जाधव विधीमंडळ सभागृहाच्या पायऱ्यांवर डोक टेकतात उभं राहून हात जोडतात आणि परत फिरतात.

या बद्दल माहिती देताना भास्कर जाधव म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी संकटात आहे, त्यांच्या पिकांना भाव मिळत नाही. कधी गारपीटींनं मोठं नुकसान होतं. त्यांना आत्महत्याना देखील सामोरे जावे लागते. अशी परिस्थीती कोणावर येऊ नये. आज मी सभागृहातून बाहेर पडलोय. आता पुढचे तीन दिवसानंतर सभागृह सुरू होणार आहे. गुढी पाडव्यामुळे मी घरी निघालो आहे, त्यामुळे पुढचे तीन दिवस मी सभागृहामध्ये येणार नाहीये.

हेही वाचा - झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

Bhaskar Jadhav returned from Legislative Assembly steps Maharashtra Budget session 2023 watch video
IND vs PAK Cricket : भारत-पाकिस्तान क्रिकेट पुन्हा सुरू करण्याबाबत आफ्रिदीचं मोठं विधान; म्हणाला, PM मोदींना…

भास्कर जाधव पुढे बोलताना म्हणाले की, मी सभागृहात येणार नाही कारण येण्याकरता इच्छा राहीली नाहीये. मनात अत्यंत वेदना आहे. मी एकही दिवस अधिवेशनाचा चूकवत नाही. पण मला यावेळी जाणीवपूर्वक बोलू दिलं जात नाहीये. मी नियमानं बोलण्याच प्रयत्न करतोय. सभागृह कायद्याने चालवं याकरिता मी आगृही असतो. सभागृहामध्ये लक्षवेधी मांडण्याचं काम सुरी आहे. मी प्रयत्न करुन देखील माझी एकही लक्षवेधी लागलेली नाही.त्यामुळे मनात यातना आहेत, असं भास्कर जाधव म्हणाले.

Bhaskar Jadhav returned from Legislative Assembly steps Maharashtra Budget session 2023 watch video
Maharashtra Politics : शरद पवारांच्या एकेरी उल्लेखावर दादा भुसेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, "मी एवढंच बोललो की…"

काय बोलणार होते भास्कर जाधव

मला बोलू दिलं असतं तर मी एक महत्वाचा मुद्दा मांडणार होतो. कोकणात पाऊस पडल्याने रस्ते लवकर खराब होतात असं सांगितलं जातं. १९९२-९३ साली तात्कालिन एनरॉन कंपनीने बांधलेल्या रस्त्यांना अजूनही एकही खड्डा पडलेली नाहीये. यासाठी एक अभ्यासगट नेमा अशी भूमिका मी मांडतोय. जेणेकरून कोकणातील रस्ते चांगले होतील. कृषी विभागावर मी बोलायचा प्रयत्न करत होतो, पण मला संधी मिळाली नाही असेही भास्कर जाधव म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com