
भीमा कोरेगाव हिंसाचारात संभाजी भिडेंचा सहभाग नाही: पोलीस
मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सहभाग नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. यासंदर्भात यापूर्वीच भिडेंना क्लीनचीट मिळाली होती. आता दोषारोपपत्रातूनही त्यांच नाव वगळण्यात आलं आहे. याबाबतचं पत्रही पुणे पोलिसांनी मानवी हक्क आयोगाला दिल्याची माहिती भिडेंचे वकील ॲड. पुष्कर दुर्गे यांनी दिली.
हेही वाचा: Video : देशभरात उष्णतेची लाट, पण 'या' शहरात पाऊस अन् पूर
पुणे जिल्ह्यातील कोरोगाव भीमा इथं झालेल्या हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविरोधात सन २०१८मध्ये गुन्हा दाखल झाला होता. पण तपासादरम्यान संभाजी भिडे यांचा कोरोगाव भीमा हिंसाचार प्रकरणात सहभाग आढळला नसल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे. तसेच ही माहिती राज्य मानवी हक्क आयोगालाही पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात अनिता सावळे यांनी तक्रार दिली होती.
हेही वाचा: मनसुख हिरेन हत्या: प्रदीप शर्मा मुख्य सूत्रधार; NIAचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
यासंदर्भात ठाण्यातील एका व्यक्तीनं पुणे पोलीस अधीक्षकांकडून माहिती मागवली होती. या माहितीला उत्तर देताना पोलिसांनी ही माहिती दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी कोरेगाव भीमा हिसांचारात संभाजी भिडेंचा सहभाग असल्याचं आढळून आलेलं नसल्याचं कोर्टातही सांगितलं आहे. यापूर्वीही पुणे ग्रामीण पोलिसांनी हे वारंवार सांगितलं आहे. मात्र, आता संभाजी भिडेंच नाव वगळता इतर जे ४१ आरोपींवर पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलं आहे.
Web Title: Bhide Guruji Clean Chit From Bhima Koregoan Rites
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..