भिराच्या उच्चांकी तापमानाबाबत हवामान खात्याला साशंकता

पीटीआय
गुरुवार, 30 मार्च 2017

कुलाबा येथील प्रादेशिक हवामान खात्याचे विभाग प्रमुख एस. जी. कांबळे यांनी पीटीआयशी बोलताना म्हणाले, "हवामान खात्याकडे भीरा येथील सोमवारचे तापमान 46 अंश सेल्सियन असल्याची नोंद झाली. मंगळवारी सुटी होती. त्यामुळे तेथील तापमान नोंदविण्यात आले नाही. ज्यावेळी आमच्याकडे तापमान 46.5 अंश सेल्सियन असल्याची माहिती आली, त्यावेळी आम्हाला ती संशयास्पद वाटली.'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील भिरा येथील एका खाजगी तलावाजवळ मंगळवारी 46.5 अंश सेल्सियस तापमान नोंद झाले आहे. हे राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदले गेले आहे. मात्र, हवामान खात्याला या तापमानाच्या नोंदीबाबत साशंकता असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

भिरा येथील एका खाजगी तलावाजवळ असलेल्या हवामान खात्याची तापमान नोंदविणाऱ्या केंद्रातून गेल्या 24 तासात 46.5 एवढे सर्वाधिक तापमान आढळून आले आहे. मात्र मंगळवारी गुढीपाडव्याची शासकीय सुटी होती. त्यामुळे तापमानाची नोंद करण्यात आलेली नव्हती. शिवाय आजूबाजूच्या कोणत्याही परिसरात एवढे तापमान नोंद करण्यात आलेले नाही. कुलाबा येथील प्रादेशिक हवामान खात्याचे विभाग प्रमुख एस. जी. कांबळे यांनी पीटीआयशी बोलताना म्हणाले, "हवामान खात्याकडे भीरा येथील सोमवारचे तापमान 46 अंश सेल्सियन असल्याची नोंद झाली. मंगळवारी सुटी होती. त्यामुळे तेथील तापमान नोंदविण्यात आले नाही. ज्यावेळी आमच्याकडे तापमान 46.5 अंश सेल्सियन असल्याची माहिती आली, त्यावेळी आम्हाला ती संशयास्पद वाटली.'

ते पुढे म्हणाले, "जवळच्या परिसरात एवढ्या तापमानाची नोंद कोठेही झालेली नाही. त्यामुळे भिरा येथील नोंद संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले आहे. भौगोलिकदृष्ट्या भीरा हे रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतावरील गाव आहे. हे गाव तलावाजवळ आहे. येथे दाट जंगल आहे. गावाच्या जवळील पर्वतांची समुद्रसपाटीपासूनची उंची दोन हजार फूट आहे. या पार्श्‍वभूमीवर हवामान नोंद करणाऱ्या केंद्राने जर 46.5 अंश सेल्सियन तापमानाची नोंद केली तर ती संशयास्पद आहे.'

Web Title: Bhira records blistering 46.5 degrees Celsius, IMD doubts authenticity