Mumbai: सेक्स रॅकेट प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Suman Kumari Arrested
Suman Kumari Arrestedesakal

मागील काही दिवसांपुर्वी मुंबईत एका अभिनेत्री-कास्टिंग डायरेक्टरला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता आणखी एका अभिनेत्रीला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

२४ वर्षीय भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीला मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री (२१ एप्रिल) रोजी अटक केली आहे. तिच्यावर मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Suman Kumari Arrested
Indapur: छत्रपती कारखान्यात धुरळा उडणार! तीन वर्ष लांबलेली निवडणूक होणार; न्यायलयाचा मोठा निर्णय

एका पोलिस अधिकाऱ्याला वेश्याव्यवसायाची माहिती मिळाली होती. यानंतर सापळा रचत कारवाई करून गोरेगाव येथील रॉयल पाम हॉटेलवर छापा टाकण्यात आला, जिथे ही अभिनेत्री वेश्याव्यवसायासाठी अनेक मॉडेल्सचा पुरवठा करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारी ही मुंबईत सिनेमात करिअर करायला आलेल्या मॉडेल्सला हेरायची आणि या मॉडेल्सच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना वेश्या व्यवसायात ढकलायची. या कारवाईत पोलिसांनी तीन मॉडेल्सचीही सुटका केली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

Suman Kumari Arrested
Ajit Pawar: 'जे वाजपेयी-अडवाणींना जमलं नाही ते...' अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

कोण आहे सुमन कुमारी

सुमन कुमारीने अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्यांनी 'लैला मजनू' आणि 'बाप नंब्री, बेटा दस नंब्री' यांसारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री असण्यासोबतच सुमन एक गायिका देखील आहे, तिने हिंदी, पंजाबी आणि भोजपुरीसह अनेक भाषांमध्ये गाणीही गायली आहेत. अलीकडेच अभिनेत्री आरती मित्तलला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com