esakal | भोंदू मनोहर मामा म्हणतो; 'आता मला जेलमध्येच मरु द्या!'
sakal

बोलून बातमी शोधा

भोंदू मनोहर मामा तणावाखाली; म्हणे आता जेलमध्येच मरु दे!

भोंदू मनोहर मामा म्हणतो; 'आता मला जेलमध्येच मरु द्या!'

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव : भोंदूगिरी करून कॅन्सर बरा करतो म्हणून अडीच लाख उकळल्या प्रकरणी बारामती पोलिसांच्या कोठडीत असलेल्या संशयित आरोपी मनोहर मामा भोसले हा प्रचंड तणावाखाली गेल्याची माहिती पुढे आली आहे. "मी बदनाम झालो आहे...माला जेल मधून सोडू नका...माझा आता शेवट जेलमध्येच करा, मला जगायचे नाही,"  अशा पद्धतीची तणावपुर्ण भावना आरोपी भोसले हा अटकेनंतर व्यक्त करीत होता, अशी माहिती तपास अधिकारी तथा पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी दिली.

गुन्ह्यात वापरलेली गाडी ताब्यात घेणे, फिर्यादीकडून उकळलेले अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उर्वरित दोन आरोपींना अटक करणे बाकी आहे, असे पोलिसांचे म्हणणे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए.जे. गिरे या न्यायालयाने मान्य केले. तसेच आरोपी भोसले याला संबंधित न्यायालयाने पाच दिवसाची ( गुरूवार ता.१६) पोलिस कोठडी दिल्याचे अधिकारी ढवाण यांनी सांगितले. सरकारी पक्षाची बाजू अॅड. सुरेश सोनवणे यांनी न्यायालयात बाजू मांडली, तर आरोपी भोसले यांच्यावतीने अॅड. विजय ठोंबरे यांनी भूमिका मांडण्याचा प्रय़त्न केला.

हेही वाचा: महापौर ते मुख्यमंत्री! विजय रुपाणींची राजकिय कारकीर्द एका क्लिकवर

दरम्यान, बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करीत बारामतीमधील एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो, असे सांगून मनोहर भोसले याच्यासह तिघांनी रुग्णाच्या कुटुंबियांची दोन लाख ५१ हजार रुपये घेवून फसवणूक केली होती. त्या प्रकरणी शशिकांत सुभाष खरात ( वय 23, व्यवसाय मोबाइल दुरुस्ती दुकान,  रा. साठेनगर, कसबा बारामती) यांनी गुरूवार (ता.९) रोजी पोलिसात फिर्य़ाद दिली होती. त्यानुसार बारामती पोलिस ठाण्यात मनोहर मामा भोसले, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार शिंदे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.

बारामतीसह अनेक ठिकाणच्या गुन्ह्यात आवश्यक असलेला संशयित आरोपी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जिल्हा सोलापूर) याला पोलिसांनी लोणंद (जि. सातारा) येथील एका फार्म हाऊसवर शुक्रवार (ता.१०) रोजी मोठ्या सिथापीने पकडले होते. अटक आरोपी मनोहर मामा वगळता उर्वरित विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार शिंदे या आरोपींना अद्याप फरार आहेत, त्यांच्या मागावर पोलिस आहेत.

हेही वाचा: भोसरीत रोहित्राचा शॉक लागून मजुर जखमी

पोलिस कोठडीत असलेले संशयित आरोपी मनोहर भोसले,  `सकाळ`शी बोलताना म्हणाले, की ज्या लोकांना मी ओळखतही नाही, अशा लोकांनी माझ्या विरोधात भूमिका घेतली आहे. अनापेक्षित घटनांना सामोरे जावे लागत आहे. याचे मला वाईट वाटत आहे, असे भावनिक उद्धगार काढत त्यांनी झालेल्या आरोपांचे त्यांनी खंडन केले.

loading image
go to top