Bhushan Desai News : आधी बाप पळवत होते, आता मुलं पळवतायत - संजय राऊत

हा कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न मिंधे गटासमोर आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.
sanjay Raut on Bhushan desai
sanjay Raut on Bhushan desaiSakal

ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरुन सुभाष देसाई यांनी निवेदनही जाहीर केलं. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुभाष देसाई हे पक्षाचे नेते आहेत, त्यांचा मुलगा नाही. त्याचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, असंही राऊत म्हणाले आहेत. तसंच शिंदे गट कुचकामी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. राऊत म्हणाले, "सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे चिरंजीव नाहीत. त्या मुलाचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही."

sanjay Raut on Bhushan desai
Bhushan Desai News : भूषण देसाईंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला? स्पष्टच सांगितलं कारण…

शिंदे गटाची भरती कुचकामी आहे, असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. राऊत म्हणाले,"शिंदे गट आधी बाप पळवत होते, आता मुलं पळवत आहेत. त्यांची भरती कुचकामी आहे. सामंत लोणीवाले हे मिंधे गटात आहेत. त्यांनी देसाईंच्या चिरंजीवावर आरोप केले होते. त्यांच्या चौकशीचेही आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी वॉशिंग मशीनमधून त्यांना स्वच्छ केलं."

sanjay Raut on Bhushan desai
Bhushan Desai यांचा Eknath Shinde Shivsena मध्ये प्रवेश का केला?

"ही भाजपाची वॉशिंग मशीन आहे. याचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. मिंधे गटासमोर हा कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न आहे", असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com