
LIC IPO : पहिल्याच दिवशी विक्रमी प्रतिसाद; शनिवारीही बोली खुली
एलआयसी आयपीओला बुधवारपासून (ता. ४) सुरू झाली. एलआयसी आयपीओसाठी या आठवड्यात शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत देखील बोली खुली राहील, असे एनएसईने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होत आहे, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
घोषणा झाल्यापासून ग्राहक एलआयसी आयपीओची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची वाट बुधवारी संपली आणि एलआयसी आयपीओ सुरू झाले. भारतीय बाजारांच्या इतिहासातील सर्वांत मोठा (IPO), LIC IPO ने बोलीच्या पहिल्या दिवशी १२:५१ तासांनी ३३ टक्के समभागांची विक्री झाली. एलआयसी पॉलिसीधारक आयपीओमध्ये खरेदी करण्यात आघाडीवर आहेत. त्यांनी आरक्षित क्षमतेच्या १.१६ पट सदस्यत्व घेतले आहे.
हेही वाचा: देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारने योग्य भूमिका कधी मांडलीच नाही
ग्राहकांचा प्रतिसाद पाहून शनिवारी आयपीओसाठी बोली उपलब्ध नसते. इश्यूचा मोठा आकार तसेच किरकोळ गुंतवणूकदारांकडून अपेक्षित मागणी पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे. बीएसई आणि एनएसईने घेतलेल्या या निर्णयामुळे शनिवारी बँकिंग व्यवस्थेवर कमी ताण पडेल असेच दिसून येते. आयपीओसह भारत सरकार २२१.४ दशलक्ष एलआयसी समभागांची ९०२-९४९ रुपये प्रतिसमभाग दराने विक्री करीत आहे. यातुन अंदाजे २१० अब्ज रुपये उभे केले जातील.
किरकोळ गुंतवणूकदारांना ऑफरमधील एकूण समभागांपैकी ३५ टक्के वाटप केले जाईल आणि आयपीओ किमतीवर प्रति शेअर ४५ रुपये सूट दिली जाईल. सुमारे दहा टक्के फ्लोट एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी ६० रुपये प्रति शेअर सूट देऊन राखून ठेवलेला आहे. किमान बिड लॉट आकार १५ शेअर्सचा आहे. याचा अर्थ किरकोळ गुंतवणूकदाराला प्रति लॉट किमान १३,३३५ रुपये खर्च करावे लागतील.
हेही वाचा: वर्गात घुसून विद्यार्थिनीचे कपडे काढले; विद्यार्थ्यांसमोर केली लघवी
पहिल्याच दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत आयपीओची ०.१९ पटीने, रिटेलसह ०.२८ पटीने, कर्मचारी आरक्षित ०.४१ पट आणि पॉलिसीधारकांनी ०.४१ पटीने सदस्यता घेतली. एलआयसी ६५ वर्षांपासून भारतातील लोकांना जीवन विमा प्रोडक्ट्स देत असल्यााचे मार्केट एक्स्पर्ट आनंद राठी म्हणाले. ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.
Web Title: Bids Open For Lic Ipo Till Saturday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..