
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारने योग्य भूमिका कधी मांडलीच नाही
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाविकासआघाडी सरकारने निव्वळ टाईमपास केला. ट्रिपल टेस्ट केली नाही. त्यामुळे सर्वोच न्यायालयाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) घ्या असा आदेश द्यावा लागला. ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम ठाकरे सरकारने केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांनी केला. (Elections due to time pass by the government)
तत्काळ निवडणुका (Election) घ्या असे न्यायालयाने सांगणे हे शंभर टक्के सरकारचे अपयश आहे. सरकार ट्रिपल टेस्ट पूर्ण करीत नाही. किती दिवस थांबायचे हाही प्रश्नच आहे. सरकारने नवीन कायदा केला तो अमलात आणला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
हेही वाचा: वर्गात घुसून विद्यार्थिनीचे कपडे काढले; विद्यार्थ्यांसमोर केली लघवी
या निर्णयामुळे ओबीसींची अपरिमित हानी झाली आहे. यास सर्वस्वी सरकारच (government) जबाबदार आहे. सरकारने योग्य भूमिका कधी मांडलीच नाही. योग्य प्रकारे कार्यवाही केली नाही. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे समजून घेऊ आणि पुढील भूमिका मांडू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ढाचा पाडल्याचा अभिमानच
सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले जे मर्सीडीज बेबी आहेत ते कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा उडवू शकतात. परंतु, कितीही थट्टा उडवली तरी आमच्यासारख्या लाखो कारसेवकांना मशिदीचा ढाचा पाडल्याचा गर्व आहे. त्यावेळी मी स्वतः तेथे होतो आणि नगरसेवक होतो, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
Web Title: Elections Due To Time Pass By The Government Devendra Fadnavis Nagpur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..