सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा दणका! पोलिसांच्या अहवालानुसार ग्रामीणमधील 6 ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द; सोलापूर शहर हद्दीत 9 ऑर्केस्ट्रा बार सुरू

रात्री १२ ते पहाटे १ नंतरही ऑकेस्ट्रा बार सुरू ठेवल्याप्रकरणी सातत्याने ग्रामीण भागातील ऑर्केस्ट्रा बार चालकांवर सोलापूर तालुका पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. पण, काटेकोरपणे नियमांचे पालन होत नव्हते. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला होता.
 ऑर्केस्ट्रा बार प्रकरण
ऑर्केस्ट्रा बार प्रकरणSakal

सोलापूर : रात्री १२ ते पहाटे १ नंतरही ऑकेस्ट्रा बार सुरू ठेवल्याप्रकरणी सातत्याने ग्रामीण भागातील ऑर्केस्ट्रा बार चालकांवर सोलापूर तालुका पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. पण, काटेकोरपणे नियमांचे पालन होत नव्हते. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामीण हद्दीतील सहा ऑर्केस्ट्रा बारवर कडक कारवाई केली. चौघांचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर दोघांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे.

ऑर्केस्ट्रा बारसाठी पोलिसांच्या माध्यमातून परवानगी दिली जाते, पण त्यासाठी ठराविक अटी व नियम घालून देण्यात आले आहेत. पैसे उधळता येत नाहीत, बैठक व्यवस्था स्वतंत्र हवी, अश्लील हावभाव, ऑर्केस्ट्रा बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, ऑर्केस्ट्रा बार रात्री किती वाजेपर्यंत सुरू असावा, शासंदर्भातील ते नियम आहेत. मात्र, शासनाने ठरवून दिलेले नियम सर्रासपणे कागदावरच राहतात अशी वस्तुस्थिती पोलिसांना अनेकदा कारवाईवेळी आढळली आहे. सातत्याने कारवाई करून, त्यांना नियम व अटींचे पालन करा म्हणून सूचना करूनही त्याठिकाणी परिस्थिती ‘जैसे थे’च राहिली. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी संबंधित ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द व निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ऑर्केस्ट्रा बार चालकांना दणका दिला आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, उपअधीक्षक संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांची कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे. त्यांनीच या ऑर्केस्ट्रा बारवर सातत्याने वॉच ठेवून कारवाई केली होती. ग्रामीण पोलिसांनी यासंदर्भातील माहिती गुरुवारी (ता. २५) विशेष पोलिस महानिरीक्षक यांना सादर केली आहे.

परवाना रद्द व निलंबित झालेले बार

हॉटेल विजयराज ऑर्केस्ट्रा बार (नान्नज, ता. उत्तर सोलापूर), हॉटेल कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार (कोंडी, ता. उत्तर सोलापूर), हॉटेल ॲपल ऑर्केस्ट्रा बार (खेड, ता. उत्तर सोलापूर), हॉटेल गॅलक्सी ऑर्केस्ट्रा बार (कोंडी, ता. उत्तर सोलापूर) यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. तर हॉटेल पुष्पक ऑर्केस्ट्रा बार (कंदलगाव, ता. दक्षिण सोलापूर), हॉटेल न्यु सॅन्ट्रो लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार (बळेवाडी, ता. बार्शी) यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे.

शहर हद्दीतील तीन ऑर्केस्ट्रा बार बंद, सध्या नऊ सुरू

सोलापूर शहर पोलिसांच्या हद्दीत साधारणत: नऊ ऑर्केस्ट्रा बार सुरू असून त्यात सोलापूर-पुणे महामार्ग, हैदराबाद रोड, विजयपूर रोड अशा ठिकाणी ते आहेत. यापूर्वी तीन ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी कारवाई केली असून विविध कारणास्तव ते बार सध्या बंद आहेत. शहराच्या हद्दीतील ऑर्केस्ट्रा बार चालक शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे तंतोतंत पालन करतात का? याकडे शहर पोलिस वारंवार लक्ष ठेवून असतात. अचानकपणे त्याठिकाणी छापे टाकून त्यासंदर्भातील पाहणी केली जाते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्या त्या वेळी कारवाई देखील केली जाते, अशी माहिती शहर पोलिसांनी दिली. सतत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने निलंबित तथा रद्द होतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com