Uddhav Thackrey: ठाकरे गटाला मोठा धक्का! जिल्हाप्रमुखांच्या बैठकीआधीच जिल्हाप्रमुखाचा ठाकरे गटाला रामराम

उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक बोलवलेली असतानाच ठाकरे गटाला मोठा झटका
Uddhav Thackrey
Uddhav ThackreyEsakal

सत्तासंघर्षाच्या न्यायालयातील सुनावणी नंतर आता ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. शिवसेना आणि ठाकरे गट यांच्याकडून पक्ष वाढीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक बोलवलेली असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुखाने ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा, विधानसभा यांच्यासह महापालिका निवडणुकांवर चर्चा करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर ठाकरे गटाने ही बैठक बोलावल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. अशातच उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. या बैठकीपूर्वीच पुणे जिल्ह्याच्या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Uddhav Thackrey
Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या! गौतमीची क्रेझ संपली?

उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी शिवसेना नेते विजय शिवतारे देखील उपस्थित होते. महेश पासलकर हे ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख आहेत. तसेच वीर बाजी पासलकर ग्रामीण विकास केंद्राचे ते अध्यक्षही आहेत. पासलकर हे अत्यंत संघर्षातून जिल्हाप्रमुख पदावर पोहोचले होते.

Uddhav Thackrey
Lady Singham: ‘डॅशिंग लेडी सिंघम’चं अपघाती निधन; होणाऱ्या नवऱ्याला केली होती अटक

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी चर्चा होणार आहे. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहीती आहे.

Uddhav Thackrey
Gautami Patil: नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा! मद्यपींच्या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com