लाखो भाविकांनी आज मंदिर शिखर, पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण केली. आजही जोतिबा डोंगर गुलालात न्हाऊन गेला.
जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (Jyotiba Dongar) तथा वाडीरत्नागिरी येथे सलग सुट्या तसेच लग्नसराईच्या निमित्ताने भाविक व पर्यटकांची वर्दळ आहे. सहकुटुंब पर्यटक दिवसभर डोंगरावर दर्शनाबरोबर पर्यटनाचा (Tourism) आनंद लुटत आहेत. आठवडाभर डोंगरावर अशीच गर्दी राहणार असल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले. जवळपास सुमारे दीड लाख भाविकांनी देवाचे दर्शन घेतले.