
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची पडताळणी सध्या सुरू आहे. याच धर्तीवर आता लाडक्या भावांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी देखील आता निकषांवर बोट ठेवले जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेतून दीड महिन्यांतच सुमारे साडेचार लाख तरुणांनी अर्ज केले होते, त्यांचे प्रशिक्षण फेब्रुवारीअखेर संपणार आहे. पण, पुढील टप्प्यात प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक तरुणांसह मनुष्यबळाची मागणी करणाऱ्या आस्थापना, उद्योगांचीही पडताळणी केली जाणार आहे.