मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ महिन्यात मिळणार एकदम ४५०० रुपये; लाभार्थींची पडताळणी सोडून अंगणवाडी सेविका आंदोलनाच्या तयारीत, वाचा...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना डिसेंबर व जानेवारीचा हप्ता आता मिळेल, अशी आशा होती. मात्र, सर्व लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाल्यावरच आता पुढील लाभ वितरित होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पावणेदोन लाख महिलांची ‘ई-केवायसी’ करायची राहिली आहे. दुसरीकडे, ९८ हजार २१ महिलांची ई-केवायसी भरताना चूक झाली आहे.
Ladki Bahin

Ladki Bahin

sakal 

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना डिसेंबर व जानेवारीचा हप्ता आता मिळेल, अशी आशा होती. मात्र, सर्व लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाल्यावरच आता पुढील लाभ वितरित होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पावणेदोन लाख महिलांची ‘ई-केवायसी’ करायची राहिली आहे. दुसरीकडे, ९८ हजार २१ महिलांची ई-केवायसी भरताना चूक झाली आहे.

चारचाकी वाहन नसलेल्या, २१ ते ६५ वर्षांपर्यंत वय असलेल्या, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलाच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील साडेअठरा हजार लाभार्थींचे वय योजनेच्या निकषांत बसत नाही, तरीदेखील त्यांनी लाभ घेतला आहे. ज्यांनी ई-केवायसी करताना सरकारी नोकरदार असल्याचे नमूद केले, त्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे.

दुसरीकडे, निकषांनुसार अपात्र असताना देखील लाभ घेतलेल्यांचीही चौकशी होणार आहे. त्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविली आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांनी या कामासाठी नकार दिला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून संशयित लाडक्या बहिणींच्या याद्या देऊनही त्यांची पडताळणी थांबली आहे.

राहिलेल्या महिलांसाठी महिन्याची मुदत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील २० लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन लाख लाडक्या बहिणी आहेत. दोन दिवसांपूर्वी महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात या महिलांना ई-केवायसी करण्यासाठी आचारसंहिता संपल्यावर एक महिन्याची मुदतवाढ देण्याचे ठरल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

...तर अंगणवाडी सेविकांचे राज्यभर आंदोलन

लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’सह त्यांच्या पडताळणीचे काम अंगणवाडी सेविका करणार नाहीत. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता दरमहा मानधनासोबत द्यावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटी द्यावी. पेन्शन लवकर सुरू करावी. अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेचा दर्जा द्यावा, किमान वेतन द्यावे, अशा आमच्या मागण्या आहेत. त्या मंजूर कराव्यात; अन्यथा सर्वजण आंदोलन करतील.

- सूर्यमणी गायकवाड, सरचिटणीस, अंगणवाडी कर्मचारी संघ, महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com