मोठी बातमी! ‘डीएड’ कायमचेच बंद होणार; आता बारावीनंतर 4 वर्षांचे इंटिग्रेटेड ‘बीएड’, पण चालू वर्षाचे प्रवेश जुन्याच पद्धतीने; 22 मेपासून प्रवेश प्रक्रिया

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २०२९ पूर्वी राज्यातील सर्व ‘डीएड’ महाविद्यालये बंद होऊन त्याठिकाणी चार वर्षांचे इंटिग्रेटेड ‘बीएड’ सुरू होणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार असून २२ मेपासून ‘डीएड’साठी प्रवेश सुरू होणार आहेत.
शिक्षक
शिक्षकGoogle
Updated on

सोलापूर : राज्यात २०१२-१३ मध्ये एक हजार ४०५ ‘डीएड’ महाविद्यालये होती, पण २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी अवघे ५७१ महाविद्यालयेच अस्तित्वात आहेत. १२ वर्षांत राज्यातील सुमारे साडेआठशे ‘डीएड’ महाविद्यालयांना पटसंख्येअभावी टाळे ठोकावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २०२९ पूर्वी राज्यातील सर्व ‘डीएड’ महाविद्यालये बंद होऊन त्याठिकाणी चार वर्षांचे इंटिग्रेटेड ‘बीएड’ सुरू होणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार असून २२ मेपासून ‘डीएड’साठी प्रवेश सुरू होणार आहेत.

दहा ते बारा वर्षांपूर्वी विज्ञान, वाणिज्य शाखेतून ९० ते ९५ टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा कल ‘डीएड’कडेच असायचा. दोन वर्षाच्या शिक्षणानंतर थेट शिक्षकाच्या नोकरीची संधी मिळते म्हणून दरवर्षी राज्यातील तीन लाख विद्यार्थी ‘डीएड’साठी अर्ज करत होते. प्रवेश क्षमतेच्या दुप्पट- तिप्पट अर्ज येत असल्याने ७५ टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना देखील प्रवेश मिळत नव्हता. पण, आता ४५ ते ५५ टक्के गुण घेतलेले विद्यार्थी देखील ‘डीएड’साठी प्रवेश घेत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. शिक्षक भरतीस विलंब, खासगी शिक्षण संस्थांचे भरमसाट डोनेशन अशा कारणांमुळे अनेकांनी ‘डीएड’ करून शिक्षक भरतीची वाट पाहिली पण भरती दरवर्षी होत नसल्याने ते दुसरा पर्यायी रोजगार करत आहेत.

खासगी शिक्षण संस्थांचे नोकरीसाठी २० लाखांहून अधिक रुपयांचे डोनेशन आहे. सध्या प्रवेशाच्या ३० हजार जागा असूनही २० हजार विद्यार्थी सुद्धा अर्ज करत नाही, अशी विदारक अवस्था आहे. त्यामुळे अनेकांनी डीएड महाविद्यालयांचा गाशा गुंडाळला असून त्यात यंदाच्या वर्षी आणखी वाढ होईल, असे अधिकारी सांगतात.

चालू वर्षातील ‘डीएड’ची स्थिती

  • अस्तित्वातील महाविद्यालये

  • ५७१

  • प्रवेश क्षमता

  • ३०,०००

  • खुल्या प्रवर्गासाठी गुणांची अट

  • ५० टक्के

  • आरक्षित प्रवर्गासाठी गुण

  • ४५ टक्के

कृती आराखडा केंद्रीय स्तरावर

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षक पात्रतेसाठी ‘डीएड’ऐवजी ‘बीएड’ करावे लागू शकते. इयत्ता बारावीनंतर विद्यार्थ्यांना थेट ‘बी.एड.’साठी प्रवेश मिळेल आणि चार वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला पदवीचेही प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याची अंमलबजावणी आगामी काळात अपेक्षित होईल. पण, सध्या प्रचलित पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

- जितेंद्र साळुंखे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर

शिक्षक भरतीसाठी ‘टीईटी’ असणार बंधनकारक

२००९ मधील आरटीई कायद्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गावरील शिक्षक भरतीसाठी ‘टीईटी’चा (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपर- एक आणि सहावी ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी पेपर-दोन उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. त्यापुढील वर्गांसाठी ‘टीएआयटी’चे बंधन आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‘डीएड’ बंद होऊन ‘बीएड’ सुरू झाले तरीदेखील पात्रता परीक्षा कायद्यानुसार बंधनकारक असतील, अशी माहिती संचालक महेश पालकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com