

land related news
solapur sakal
तात्या लांडगे
सोलापूर : दरमहा जिल्ह्यात सरासरी दोन हजारांवर जमीन, जागेच्या खरेदी- विक्रीची दस्तनोंदणी होते. त्यात खरेदीनंतर अनेकांचे वाद निर्माण होतात. चतु:सीमा चुकीची आहे, जमिनीत अतिक्रमण आहे, अशा तक्रारी असतात. त्यामुळे जमिनीची मोजणी करून भूमी अभिलेख कार्यालयातील गट नकाशा जोडून खरेदीदस्त केल्यास भविष्यातील कटकटी कायमच्याच दूर होतील, असा विश्वास जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी अनिकेत बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.