मोठी बातमी! शुक्रवार, शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच मार्गांवरील एसटी वाहतूक राहणार बंद, नेमके कारण काय? वाचा...

शनिवारी (ता. ७) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (ता. ६) जिल्ह्यातील दोन हजार ७५८ मतदान केंद्रांवर मतदान साहित्य तसेच तेथे नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहतुकीसाठी ३५१ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
ST Bus
ST Busesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यात शनिवारी (ता. ७) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (ता. ६) जिल्ह्यातील दोन हजार ७५८ मतदान केंद्रांवर मतदान साहित्य तसेच तेथे नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहतुकीसाठी ३५१ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी या बसगाड्या वापरात घेतल्यामुळे शुक्रवारी व शनिवारी जिल्ह्यातील बऱ्याच स्थानिक मार्गांवरील बससेवा बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार असून, नागरिकांनी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाकडे ५२५ साध्या बसगाड्या आहेत. प्रत्येक तालुक्यातील मार्गांवरून या बसगाड्या धावतात. मध्य व लांब पल्ल्याची वाहतूक करणाऱ्या गाड्या देखील आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे सोलापूर-पुणे महामार्गावरील बस वाहतूक सुरळीत ठेवली जाणार आहे. परंतु, गावगाड्यातील बऱ्याच मार्गांवरील बस वाहतूक दोन दिवस बंदच राहणार आहे. ७ फेब्रुवारीला मतदानादिवशी सुट्टीच असणार आहे. पण, शुक्रवारी (ता. ६) निवडणुकीचे साहित्य व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांपर्यंत पोचविण्यासाठी बस जाणार असल्याने त्या दिवशी प्रवाशांसाठी बस उपलब्ध नसणार आहेत. रविवारपासून (ता. ८) नेहमीप्रमाणे त्या-त्या मार्गांवरील बस त्यांच्या वेळेत धावतील, असे ‘परिवहन’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सार्वजनिक वाहतुकीवर होईल परिणाम, पण...

सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान आहे. त्या दिवशी मतदान साहित्य व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ३५१ बसगाड्या लागणार आहेत. त्यामुळे ६ व ७ फेब्रुवारीला जिल्ह्यातील साध्या बस, मध्यम व लांब पल्ल्याची वाहतूक बंद राहील.

- अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, सोलापूर

प्रवाशांनी स्थानकात विचारुनच करावा प्रवास

निवडणुकीमुळे दोन दिवस जिल्ह्यातील मार्गांवर अवघ्या दीडशे गाड्या असतील. दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनीही ही बाब ध्यानात घ्यावी, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही. अन्य प्रवाशांनीही त्या दिवशी नियमित येणारी बस त्या दोन दिवसांत येणार आहे की नाही, याची खात्री करावी, असे आवाहन परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील स्थिती

  • मतदान

  • ७ फेब्रुवारी

  • जिल्ह्यातील मतदान केंद्रे

  • २,७५८

  • सोलापूर विभागाकडील बस

  • ५२५

  • निवडणुकीसाठी बसगाड्या

  • ३५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com