मोठी बातमी! विद्यापीठ उभारणार साडेसहा कोटींचे डेटा सेंटर; १ ऑगस्टपासून नवीन इमारतीतून कामकाज, नव्या इमारतीला ६ लिफ्ट, २ कोटींचे संगणक, वाचा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित ११४ महाविद्यालये आहेत. याशिवाय विद्यापीठात विविध १५ संकुले आहेत. तेथील एकूण ७० हजार विद्यार्थ्यांची माहिती सुरक्षित राहावी, यासाठी आता सहा कोटी ५८ लाख रुपयांचे डेटा सेंटर उभारले जाणार आहे.
Data Center

Data Center

Sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित ११४ महाविद्यालये आहेत. याशिवाय विद्यापीठात विविध १५ संकुले आहेत. तेथील एकूण ७० हजार विद्यार्थ्यांची माहिती सुरक्षित राहावी, यासाठी आता सहा कोटी ५८ लाख रुपयांचे डेटा सेंटर उभारले जाणार आहे. निविदा प्रक्रियेत पुण्यातील विन्टेक कंपनीला त्याचे काम मिळाले आहे.

विद्यापीठाच्या डेटा सेंटरमध्ये मागील १० वर्षांतील डेटा आणि पुढील ३० वर्षांतील विद्यार्थ्यांची माहिती सुरक्षितपणे साठवून ठेवली जाणार आहे. हैदराबाद येथील विद्यापीठाकडे देखील हा डेटा साठविला जाणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाची माहिती विविध संस्थांकडे होती. पण, स्वत:चे डेटा सेंटर झाल्याने ही माहिती विद्यापीठाकडेच राहणार आहे. दरम्यान, नवीन प्रशासकीय इमारतीतील लिफ्ट व डेटा सेंटरसाठी विद्यापीठ विकास निधी खर्च केला जाणार आहे. तर प्रशासकीय इमारतीतील संगणकांसाठी ‘पीएम-उषा’तून निधी दिला जाणार आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता. १२) विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली. यावेळी बांधकाम समितीत मंजूर झालेले काही विषय व्यवस्थापन परिषदेच्या विषयपत्रिकेत नव्हते, परंतु त्या कामांसाठी लाखोंचा निधी देण्यास मंजुरी मिळालेली होती. त्यावर काही सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सर्वांची समजूत काढली. त्यानंतर त्या सर्व विषयांना मान्यता देण्यात आली.

नवीन इमारतीत २ कोटींचे संगणक अन्‌ सव्वाकोटींच्या सहा लिफ्ट

हिरज रोडवरील सोलापूर विद्यापीठाच्या ४८२ एकर परिसरात ५२ कोटींची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १ ऑगस्टपासून विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज त्याठिकाणाहून चालणार आहे. या इमारतीत दोन कोटी रुपयांचे संगणक बसविले जाणार आहेत. तर एक कोटी २१ लाख रुपयांच्या सहा लिफ्ट बसविल्या जाणार आहेत. याची निविदा प्रक्रिया झाली आहे. पुढील दोन-अडीच महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे या बैठकीत ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com