मोठी बातमी! जिल्हा परिषद शाळांवर अध्यापनासाठी नेमता येणार स्वयंसेवक; शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार; दरमहा मानधन किती? वाचा...

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक कमी असल्याने शेजारील शाळांमधील शिक्षकांवर त्या शाळांची जबाबदारी सोपविली आहे. त्यातून अनेक शाळांवरील ज्येष्ठ शिक्षकांनी डमी शिक्षक नेमल्याचेही आरोप गावकरी करीत आहेत. मात्र, गावकऱ्यांचा हा दावा खोटा असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.
zp schools
zp schoolssakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळा आहेत. त्यापैकी २०० हून अधिक शाळांवर विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक नाहीत. या पार्श्वभूमीवर गावातील शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकारात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वयंसेवक नेमता येतो, ही बाब समोर आली आहे. त्या स्वयंसेवकाचे मानधन मात्र व्यवस्थापन समितीला द्यावे लागते.

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक कमी असल्याने शेजारील शाळांमधील शिक्षकांवर त्या शाळांची जबाबदारी सोपविली आहे. त्यातून अनेक शाळांवरील ज्येष्ठ शिक्षकांनी डमी शिक्षक नेमल्याचेही आरोप गावकरी करीत आहेत. मात्र, गावकऱ्यांचा हा दावा खोटा असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. दरम्यान, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनी नियमित शाळांना अचानक भेटी देणे अपेक्षित आहे. मात्र, सर्वच पदे कमी असल्याने शाळांना नियमित भेटी दिल्या जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यातून सांगोला, मंगळवेढा तालुक्यात डमी शिक्षक नेमण्याचे प्रकार झाल्याचे आरोप झाले. तो डमी शिक्षक नव्हे तर स्वयंसेवक असून त्याचा अहवाल मागविल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

डमी शिक्षक नेमता येत नाही, कोणी नेमला आणि ते खरे निघाल्यास संबंधित शिक्षकावर आणि त्या शाळेतील मुख्याध्यापकावर कठोर कारवाई होऊ शकते, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे. आपल्या गावातील शाळेतील शिक्षकांचे कामकाज, अध्यापन, गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक

शाळा व्यवस्थापन समितीला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार संगणक किंवा कला-क्रीडा संदर्भातील स्वयंसेवक नेमता येतो. परंतु, त्याची माहिती गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकाऱ्यांना देऊन त्या स्वयंसेवकाची मान्यता घेणे बंधनकारक आहे.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

स्वयंसेवकाचे मानधन समितीच्या खिशातून

शाळा व्यवस्थापन समितीला गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वयंसेवक नेमता येतो. त्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यावर त्या स्वयंसेवकास शासनाकडे मानधन मागता येत नाही. त्याचे मानधन त्या शाळा व्यवस्थापन समितीला स्वत:च्या खिशातून द्यावे लागते. ज्या शाळांनी स्वयंसेवक नेमले, त्यांना साधारणत: दहा हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com