HSRP New Deadline: हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP नंबर प्लेट सर्व प्रकारच्या वाहनांना बसवणं आता शासनानं बंधनकारक केलं आहे. त्यानुसार २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यासाठी सध्या राज्यात मोहिम सुरु आहे. यासाठी ३० मार्च २०२५ ही डेडलाईन देण्यात आली होती. पण ही डेडलाईन संपायला केवळ दहाच दिवस शिल्लक असताना आता याला मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनानं यासाठीचं परिपत्रक काढलं आहे.