Mumbai Covid Center Scam: मुंबई कोव्हीड सेंटर घोटाळ्याबाबत मोठी अपडेट: 'त्या' पत्रावर आयुक्त अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरी

मुंबई कोव्हीड सेंटर घोटाळ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Big Update on Mumbai Covid Center Scam
Big Update on Mumbai Covid Center Scam

मुंबई कोव्हीड सेंटर घोटाळ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने सुजीत पाटकर यांच्या कंपनीला वर्क ऑर्डर दिल्याचं पत्र समोर आलं आहे. या पत्रावर आयुक्त अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरी असल्याचीही माहिती मिळाली आहे. (Big Update on Mumbai Covid Center Scam Work Order to Sujeet Patker signed by Commissioner Sanjeev Jaiswal BMC Commissioner Iqbal Chahal )

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात माहिती देत वर्क ऑर्डरचे पत्र ट्विट केले आहे. पुणे महानगरपालिकेने सुजीत पाटकर यांच्या कंपनीला काळ्या यादीत टाकलं होतं. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने पाटकर यांच्या कोव्हीड सेंटरचे कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. तसेच तक्रारदेखील दाखल केली होती.

त्यानंतर काल पाटकर यांच्या घरी छापे टाकण्यात आलं. दरम्यान सोमय्या यांनी मोठी अपडेट दिली आहे.

काय आहे ट्विटमध्ये?

किरीट सोमय्या यांनी जुलै २०२० वर्क ऑर्डची कॉपी ट्विट केली आहे. यावर बीएमसीचे आयुक्त इकबाल सिंग चहल तसेच अतिरिक्त आयुक्त या दोघांची स्वाक्षरी आहे, असं नमुद केलं आहे. या घोटाळ्यात ज्यांनी ज्यांनी साथ दिली आहे त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागणार. असा इशारा सोमय्या यांनी दिला होता. तर आता या ट्विटमुळे आयुक्त अतिरिक्त आयुक्त रडारवर येण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विसेस ही कंपनी आहे. कोविड काळात वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम या कंपनीला दिलं होतं. पण त्यात मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. त्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू झाला होता. हा तपास सुरू असतानाच ईडीने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून पाटकर यांना दणका दिला.

त्यानतंर ईडीने सुजीत पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित 10 ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. या दहाही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. किती तास हे सर्च ऑपरेशन चालेल याची काहीच शाश्वती नाही. मात्र, या सर्च ऑपरेशनमध्ये ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com