सीआरपीएफ जवानाचा चौघांसह महिलेवर सामूहिक बलात्कार

वृत्तसेवा
Thursday, 5 December 2019

दरम्यान, उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात सामूहिक बलात्कार झाला असून, आरोपींमध्ये सीआरपीएफचा जवान आणि निवृत्त तुरुंगाधिकाऱ्याच्या मुलाचा समावेश आहे.​

समस्तीपूर (बिहार) : हैदराबाद, बक्‍सर येथील बलात्काराच्या घटनेने देश हादरलेला असताना, समस्तीपूर येथे अत्याचाराच्या क्रोर्याची परिसीमा गाठणारी घटना उघडकीस आली आहे. वारीसनगर येथे अर्धवट जळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला असून, संबंधित महिलेची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात सामूहिक बलात्कार झाला असून, आरोपींमध्ये सीआरपीएफचा जवान आणि निवृत्त तुरुंगाधिकाऱ्याच्या मुलाचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

समस्तीपूर जिल्ह्याच्या वारीसनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोही पंचायतच्या दरदरी चौर येथून आज सकाळी एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळून आला. वारीसनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी प्रसुंजय कुमार म्हणाले, की या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही. या महिलेचा अन्य ठिकाणी खून झाला असावा आणि तिची ओळख लपविण्यासाठी तिचा मृतदेह दरदरी चौर येथे आणून तिला जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले.

काय घडलं बैठकीत? ज्यानंतर अजित पवारांनी बंड केलं?

अशाच प्रकारची घटना काल बक्‍सर येथे घडली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा दिलमानी मिश्रा म्हणाल्या, की बिहारमधील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे प्रशासन महिलांप्रती गंभीर नसल्याचे दिसून येते. महिला अत्याचारासंदर्भात बजावलेल्या नोटिसांप्रती स्थानिक प्रशासन उदासीन असल्याचाही आरोप मिश्रा यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Burnt body of woman found in Samastipur