esakal | Bird Flu: राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये 'बर्ड फ्लू'चा प्रभाव

बोलून बातमी शोधा

Bird Flu: राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये 'बर्ड फ्लू'चा प्रभाव

'बर्ड फ्लू'मुळे राज्यातील 22 जिल्हे प्रभावित झाले असून आतापर्यंत 1151 विविध पक्षी मृत झाले आहेत.

Bird Flu: राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये 'बर्ड फ्लू'चा प्रभाव
sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: 'बर्ड फ्लू'मुळे राज्यातील 22 जिल्हे प्रभावित झाले असून आतापर्यंत 1151 विविध पक्षी मृत झाले आहेत. अहमदनगर, यवतमाळ,वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात पक्षी मृत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. 

राज्यातील कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, ठाणे 35, रायगड 4, सातारा 9, सांगली 20, अहमदनगर 151, बीड 25, लातूर 253, उस्मानाबाद , अमरावती 90, यवतमाळ 205, नागपूर 45, वर्धा 109, चंद्रपुर 4, गोंदिया 23,  गडचिरोली 2, अशी 182 पक्षांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 22 जिल्ह्यांमध्ये कुक्कूट पक्षांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात मुंबई 2, ठाणे 29, रायगड 1, रत्नागिरी 5, कोल्हापूर 3. नाशिक 18, अहमदनगर 2, लातूर 1, नांदेड 2, यवतमाळ 3 आणि वर्धा 1 अशी एकूण 67 पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत इतर पक्षांत एकूण 21 जिल्ह्यात मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. कावळ्यांमध्ये विविध जिल्ह्यात मुंबई 5, ठाणे 38, रायगड 6, रत्नागिरी 8, पुणे 1, सातारा 2, कोल्हापूर, नाशिक 3, नंद्रबार 1, बीड 6, परभणी 1 आणि नांदेड 5, अशा प्रकारे एकूण राज्यात 87 मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत एकूण 22 जिल्ह्यांमध्ये कावळ्यांचाही मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. राज्यातील आतापर्यंत एकूण 982 पक्षांचा मृत्यू झाला आहे. सदर नमुने तपासणीसाठी ओपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत आणि पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.

पूर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष  प्राप्त झाले असून, त्यानुसार मुंबई, ठाणे आणि दापोली येथील कावळे आणि बगळे तसेच मुरुबा- परभणी येथील पोल्ट्री फार्म मधील नमुने हायली पेंथोजेनिक एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच5एन। या स्ट्रेन) करीता आणि बीड येथील कावळ्यामधील नमूने (एच5एन8 या स्ट्रेन) करीता पॉझिटीव्ह आलेले आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कुक्कुट पक्षांमधील काही नमुने पॉझिटिव्ह आले असून त्यात परभणी जिल्ह्यातील कृपटा, लातूर जिल्ह्यातील तोंदर वंजारवाडी, नांदेड जिल्ह्यातील पापलवाडी, पुणे जिल्ह्यातील चांदे, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव, अहमदनगर जिल्हयातील श्रीगोंदा, रायगड जिल्हयातील पेण येथील कुक्कुट पक्षांचे नमुने 'बर्ड फ्लू'साठी पॉझिटिव्ह आले आहेत. अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील कुक्कुट पक्षांचे नमुने नकारार्थी आहेत.

बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या मुरुंबा-जि.परभणी येथील सुमारे 3443 आणि केंद्रेवाडी, ता. अहमदपूर येथील 11064 कुक्कुट पक्षी, आणि सुकनी- लातूर येथील सुमारे 28 कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. कुक्कुट पक्षांमध्ये मरतुक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून आवश्यक त्या दक्षता आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

हेही वाचा- कंपाऊंडर डोक्यावर पडलेत का?, संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर खोचक टीका

सर्व पोल्ट्री धारक तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणा-या पक्षांचा मृत्यू  झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्म मधील पक्षामध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत्यू झाल्यास नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात याची माहिती दयावी.
अनुप कुमार, प्रधान सचिव, पशु संवर्धन विभाग

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bird flu in 22 districts Maharashtra state