
BJP Announces Candidates for 2025 Maharashtra Legislative Council Elections : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. येत्या २७ मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार असून उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी आज भाजपाकडून तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. दादाराव केचे, संजय केनेकर आणि संदीप जोशी यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.