भाजप हा शिवसेनेमुळे मोठा झालेला पक्ष - गजानन किर्तिकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

सांगली - देशात चारच पक्ष मोठे आहेत. त्यात भाजप हा पक्ष शिवसेनेमुळे मोठा झाला असल्याचे शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी म्हटले आहे. ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे चार पक्ष महाराष्ट्रामध्ये मोठे आहेत. यामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढलो तर काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होईल असे वाटत नाही. त्याचा फायदा शिवसेनेलाच होईल.

भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिले नाही कॅबेनेट मंत्री पद दिले नाही. तसेच, भाजप जर हिंदुत्ववादी असते. तर, त्यांनी सरकार स्थापन केल्यावर राम मंदिर बांधले असते. भाजप हे हिंदुत्ववादी नाही असे जनसामान्यांतून प्रतिक्रिया उमटत आहेत, असेही कीर्तिकर यावेळी म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 12 ते 13 विद्यमान नगरसेवक हे शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत, असा खुलासाही कीर्तिकर यांनी केला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसणार आहे. तसेच, सांगली महापालिका ही निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होईल पण भाजप-शिवसेना आघाडी होणार नाही.

Web Title: BJP is big party due to Shivsena says gajanan kirtikar