शिंदेच्या आग्रहानंतर फडणवीस बनले उपमुख्यमंत्री - चंद्रकात पाटील

bjp chandrakant patil made it clear eknath shinde ask devendra fasnvis to be deputy chief minister maharashtra politics
bjp chandrakant patil made it clear eknath shinde ask devendra fasnvis to be deputy chief minister maharashtra politics

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यांनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काल नेमकं काय झालं याचा खुलासा करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना चंद्रकांत पटलांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खुर्चीसाठी हिंदुत्व सोडल्याचा आरोप देखील केला. (bjp chandrakant patil made it clear eknath shinde ask devendra fasnvis to be deputy chief minister maharashtra politics)

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदुत्वासाठी भाजपची स्थापना झाली, रामजन्मभूमी आंदोलन तसेच पालघर साधूंची हत्याकांड प्रकरणात कारवाई करावी या सगळ्यासाठी आंदोलन यातून हिंदूत्व आमचा श्वास-ध्यास आहे हे आम्ही दाखवून दिलं. देशात दोन विचारधारा काम करत असतील तर एक लांगूलचालन आणि दुसरी हिंदूत्ववादी विचारधारा, हिंदूत्ववादी विचारधारा मान्य असणाऱ्यांनी आमच्याशी युती केली. २०२९ ला युती झाली पण विश्वासघात झाला, हिंदुत्व मागं पडलं खुर्ची पुढं आली, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हिंदुत्व न मानल्यामुळे ज्यांच्यावर बाळासाहेबांनी असूड ओढले त्यांच्या मांडीला मांडू लावून हे सत्तेत बसले. महाशिव आघाडी हे नाव कधी महाविकास आघाडी झालं कळलं सुद्धा नाही, त्यानंतर विकास महत्वाचा असं लॉजिक मांडलं. तेव्हा विरोध विकासाठीही होता आणि हिंदुत्वासाठीही होता असे पाटील यावेळी म्हणाले.

राम मंदीराचं भूमिपुजन झाल्यानंतर सेलिब्रेशन करण्यावर देखील बंधन लादली, कारवाया झाल्या. राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याची देखील टिंगल केली गेली. कोरोनात दारूची दुकाने सुरू केली मंदिरं सुरू करण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्रिपुरामध्ये मशीद तोडल्याची खोटी क्लीप व्हायरलं झाली, त्यावर मालेगाव, आमरावती येथे हजारो लोग रस्त्यावर आले, इंटेलिजन्स काय करतो. सगळीकडे मतांसाठी लांगूलचालन केलं

bjp chandrakant patil made it clear eknath shinde ask devendra fasnvis to be deputy chief minister maharashtra politics
मुख्यमंत्रीपद गेलं, आमदारांनीही साथ सोडली, आता उद्धव ठाकरे काय करणार?

आम्ही भूमिका मांडत राहिलो की, हा त्यांच्या अंतर्गत मुद्दा आहे, पण आमदारांच्या अंतर्गत कलहाने हे सरकार पडलं, आम्ही हेच म्हणत होतो की अंतर्गत कलहाने सरकार पडेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले. सत्तेची हाव नाही याचं मोठं उदाहरण म्हणजे ११३ आणि सहयोगी आमदार असं बहुमत भाजपकडे असताना देखील मुख्यमंत्री पद घेतलं नाही. यातून आम्हाला सत्तेचा मोह नाही हे सिद्ध होत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. सत्तेचा मोह आम्हाला नाही, होऊ शकत होते तरी हिंदुत्वासाठी आग्रह धरणारे आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. यातून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं दिसल्याचे पाटील म्हणाले. सत्तेचा मोह तुम्हाला आहे, खुर्चीसाठी हिंदुत्व तुम्ही सोडलं असा टोला देखील त्यांनी लगावला.

bjp chandrakant patil made it clear eknath shinde ask devendra fasnvis to be deputy chief minister maharashtra politics
फडणवीसांनी स्विकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; ओबीसी आरक्षणावर घेतली बैठक

प्रशासनाची आवश्यकता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असे पाटील म्हणाले. त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर मंत्रीमंडळात काम केल्याची अनेक उदाहरणे आहेत, अशोक चव्हाण आताच्या मंत्रिमंडळात होते. काल गेले असा टोलाही त्यांनी लगावला, त्यामुळे हे जगावेगळं झालं नाही. एकनाथ शिंदेंनी आग्रह धरला त्यानंतर फडणवीसांनी कार्यपध्दती म्हणून पक्ष नेतृत्वाला विचारलं नेतृत्वांने परवानगी दिली, काही चूकीचं झालं नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

जे आपल्या मंत्रिमंडळात होते त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी मोठं मन लागतं, ते मन देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं. राज्याच्या विकासासाठी, हिंदुत्वासाठी काम करणारे सरकार राज्यात आले. आमच्यात पक्षासाठी मान कापून द्यायची तयारी याचा ज्यांना हेवा वाटतो त्यांनी अंतर्गत कलह असल्याच्या बातम्या पसरवल्या असे चंद्रकांत पाटील म्हणाले. नेमकं काय घडामोडी झाल्या याबद्दल चंद्रकांत पाटील हे यावेळी स्पष्टीकरण देत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com