मुख्यमंत्रीपद गेलं, आमदारांनीही साथ सोडली, आता उद्धव ठाकरे काय करणार?

आता उद्धव ठाकरे काय करणार? ते पुन्हा शिवसेनेला कसे एकत्र करणार?, असे सवाल उपस्थित होत आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sakal
Summary

आता उद्धव ठाकरे काय करणार? ते पुन्हा शिवसेनेला कसे एकत्र करणार?, असे सवाल उपस्थित होत आहेत.

मागील दहा दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. या काळात अनेक राजकीय बदल आणि उलथापालथ झाली आहे. विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सेना आमदरांना घेऊन शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. दरम्यान, या सर्व सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे, आता उद्धव ठाकरेंचे काय होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात समोर येत आहे. (maharashtra politics)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या आमदारांनीच साथ सोडली असल्यानं शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर आला आहे. उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेलेला नाही त्यामुळं आता उद्धव ठाकरे काय करणार? ते पुन्हा शिवसेनेला कसे एकत्र करणार? बंडखोर आमदारांचे मन वळवण्यात त्यांना यश येणार का? की ही दुफळी वाढतच जाणार? , असे अनेक सवाल राजकीय वर्तुळातून समोर येत आहेत.

Uddhav Thackeray
फडणवीसांसाठी राज ठाकरेंचं ट्वीट; म्हणाले, ''तुम्ही तुमचं कर्तृत्व...''

उद्धव ठाकरेंची रणनिती काय असणार?

महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक घडामोडींनंतर काही ज्येष्ठ पत्रकारांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गुरुवारी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांचे अभिनंदन केले. तर एका बाजूला महाराष्ट्रातील अनेक मराठी वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोटो आहे. तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत. यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटात एकमेकांबद्दल फारशी नाराजी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बंडखोर आमदारांशी तडजोड करणार ?

गुवाहाटीला गेल्यापासून एकनाथ शिंदे यांची सुरुवातीपासूनची वक्तव्य पाहिली तर त्यांना शिवसेना फोडायची नाही हे स्पष्ट होते. शिंदे गटाला जे हवे त्यापद्धतीने भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात तडजोड होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray
"ब्राह्मण असल्यानेच फडणवीसांना डावललं"; ब्राह्मण महासंघाचा भाजपवर आरोप

शिंदे गटाला वेगळे करणे

उद्धव ठाकरे यांच्याकडे आणखी एक पर्याय आहे. शिंदे गटाला ते शिवसेनेपासून वेगळे करू शकतात, अशी शक्यताही दिसत नाही. मात्र शिंदे गट सध्या मजबूत असल्याने सरकार आल्यानंतर शिवसेनेचे इतर नेते आणि खासदारही शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अशा वेळी शिंदे गटाचा शिवसेनेवरील दावा अधिक भक्कम होऊ शकतो.

कायदेशीर लढाई लढावी लागेल

उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यातील चर्चा निष्फळ झाली, तर उद्धव ठाकरे कायदेशीर लढाई सुरु ठेवण्याची शक्यता आहे. शिंदे गटावरील कारवाई आणि फ्लोअर टेस्टबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. याशिवाय दोन्ही गट पक्षावरील दाव्याबाबत याचिकाही दाखल करू शकतात. उद्धव यांनी यापूर्वीच शिंदे गटाला बाळासाहेबांचे नाव न घेण्याचा इशारा दिला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि ते सत्तेतून बाहेर पडले. त्यावेळी ठाकरे संवाद साधताना म्हणाले की, भाजपाचे अमित शहा यांना अडीच वर्षे शिवसेनेचे मुख्यमंत्री घेण्यासाठी सांगितले होते. आज तेच झाले. हा निर्णय आधीच घेतला असता तर महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता. शिवसेनेनंतर पुढील अडीच वर्षे भाजपचे मुख्यमंत्री राज्यात असते.

Uddhav Thackeray
भाजपमध्ये नाराजीनाट्य? फडणवीसांच्या बॅनरवर अमित शहांचा फोटोच नाही

दरम्यान, 20 जून रोजी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनेक आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केले. येथूनच वादाला सुरुवात झाली. एक दिवसानंतर म्हणजेच २१ जून रोजी उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले आमदार सुरतला गेले. या आमदारांचे नेतृत्व कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथून सर्वजण गुवाहाटीत पोहोचले. या आमदारांचे मन वळवण्यासाठी 22 जून रोजी शिवसेनाप्रमुखांच्या सांगण्यावरून तीन नेत्यांचे शिष्टमंडळ बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी पोहोचले. मात्र, यावेळी कोणतीही चर्चा झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com