esakal | गावाच्या ग्रामपंचायतीत भाजपचा धुव्वा; चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil reaction on khanapur gram panchayat result

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून अनेक ठिकाणी दिग्गजांच्या पॅनेलला धक्का बसला आहे. 

गावाच्या ग्रामपंचायतीत भाजपचा धुव्वा; चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून अनेक ठिकाणी दिग्गजांच्या पॅनेलला धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच गावात भाजपचा पराभव झाला आहे. चंद्रकातं पाटील यांच्या खानापूर या गावात ग्रामपंचायतीच्या 9 जागा असून त्यापैकी 6 जागांवर शिवसेनेच्या पॅनेलनं विजय मिळवला आहे. 

ग्रामपंचायत निकालावर चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. खानापूरमधील निकालाबातबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, तीन जागा आम्ही जिंकल्या आहेत. तर दोन जागांवर आमचा खूपच कमी फरकाने पराभव झाला. गावाने दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. तसंच फक्त एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही तर महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील असंही त्यांनी सांगितलं. 

हे वाचा - कोल्हापुरात आजी-माजी आमदारांच्या गावात काँग्रेसचे वर्चस्व कायम

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. राज्यात तीन पक्षाचं कडबोळं सत्तेत आहे. चारही पक्षांनी स्वबळावर लढून दाखवावं मग आम्हीच एक नंबरला असू. राज्यातल्या आघाडी सरकारला ना झेंडा आहे ना अजेंडा आहे. ग्रामपंचायतीत निवडून आलो म्हणजे जिंकलो असं नाही. सरपंच निवडून आला तरच ग्रामपंचायत ताब्यात आली म्हणता येईल. संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी म्हटलं. 

हे वाचा - राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा; मंत्री दत्ता भरणेंना सर्वांत मोठा धक्का

जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार असलेल्या प्रकाश आबिटकर यांच्या गटाने खानापूरमध्ये सहा जागा जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतीत मिळालेल्या यशानंतर आबिटकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, गाव करील ते राव काय करील, खानापूरची जनता अतिशय सुज्ञ आहे. विकासाची नाळ ज्यांच्याकडे आहे त्या शिवसेवर खानापूरकरांचा विश्वास आहे असं म्हणत खानापूरच्या ग्रामपंचतीत इतिहास घडवल्याच चित्र आहे. हा एकसंघ विजय आहे. 

loading image
go to top