Uddhav Thackeray News: माझं कुळ हिंदुत्ववादी, तुम्हीच तुमचं कुळ बुडवलं, बावणकुळे उद्धव ठाकरेंवर बरसले | Shivsena News | bjp chandrashekhar bawankule reaction on uddhav thackeray speech and criticism on bjp in malegaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray,  chandrashekhar bawankule

Uddhav Thackeray News: माझं कुळ हिंदुत्ववादी, तुम्हीच तुमचं कुळ बुडवलं, बावणकुळे उद्धव ठाकरेंवर बरसले

Chandrashekhar Bawankule News: नागपूर विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

ठाकरेंमध्ये धमक असेल तर काँग्रेसची साथ सोडण्याचे जाहीर करावे, अधिक वाट न बघता उद्याच त्यांनी घोषणा करावी, नुसत्या तोंडाच्या वाफा घालवून काहीही होणार नाही.

ज्या उद्धव ठाकरे यांनी कधी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढली नाही. मागच्या दारातून विधानपरिषदेत गेलेले उद्धव ठाकरे कशाला निवडणूक घेण्याच्या बाता करतात, असा सवाल त्यांनी केला.

यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना माझा प्रश्न आहे, ते मुख्यमंत्री असताना 50 वेळेला काँग्रेस पक्षांने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, टीका केली, तरी देखील उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी मुख्यमंत्रीपद सोडले नाही, काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद भोगले.

भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. उद्धव ठाकरेंमध्ये जर धमक असेल, तर त्यांनी लगेच काँग्रेस पक्षापासून दूर होण्याचे जाहीर करावे नुसतं तोंडाच्या वाफा काढू नका. असं म्हणत त्यांनी सावरकर वादावरून सुनावलं. (Latest Marathi News)

तर पुढं म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कधी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढले नाही. मागच्या दरावरून विधानपरिषदेत गेलेले उद्धव ठाकरे कशाला निवडणूक घेण्याची गोष्ट करतात, ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही, त्यांनी निवडणूकीच्या गप्पा मारू नये. जेव्हा केव्हा निवडणूक होईल आम्ही विधानसभेतील 200 जागा जिंकून अशी भविष्यवानी देखील त्यांनी केला.

उद्धव ठाकरे नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करतात. यावर ते म्हणाले आमचा कुळ हिंदुत्ववादी आहे. तुम्ही तुमचा कूळ बुडविला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाला ज्या कुळाला उंची दिली होती ती तुम्ही बुडविली आहे. उद्धव ठाकरे तुम्ही ठाकरे कुटुंबाचं नाव बुडवत आहात..

एकदा तरी ठाकरेपणा दाखवा, काँग्रेस पक्षाची साथ सोडा, जे रोज सावरकरांचा अपमान करतात त्यांना एकदा तरी ठाकरेपणा दाखवा आणि बाहेर पडा.. फक्त सभेतूनच वल्गना करू नका.

टॅग्स :CongressUddhav Thackeray