
Jitendra Awhad News: अर्वाच्च भाषेत ट्विट करणाऱ्या आव्हाडांना शितल म्हात्रेंनी सुनावलं; बाकी निवडणुकीत धूर दाखवू…
Latest Marathi News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यात गेल्या दोन-तीन दिवसापासूव टि्वरवॉर रंगले आहे. काही दिवसापासून शीतल म्हात्रे यांच्या एका व्हिडिओवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली. या व्हिडीओ प्रकरणातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली त्यांच्या सुटकेसाठी आव्हाडांनी मविआतील नेत्यांना विनंती केली होती.
दरम्यान रविवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा झाली. या सभेच्या निमित्ताने मालेगावात लागलेले उर्दू भाषेतील बॅनरचा फोटो शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत टीका केली होती. यावरुन म्हात्रे आणि आव्हाड यांच्यात ट्विटरवॉर रंगलं आहे.
शितल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी लागलेल्या बॅनरचा फोटो ट्विट करत लिहिलं आहे की, "ह्या मातीत छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं.. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? *हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा??"
या ट्विटला उत्तर ट्विटनेच देताना जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलं की, "ह्याच्यावर बोला ताई .. खास तुमच्या माहिती साठी..कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे."
यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी दिसरं ट्विट केलं या मध्ये लिहिलं की, "त्याची आपल्याला चिंता नसावी..उगगाच बोलायला लावू नका..." त्या ट्विटला शितल म्हात्रे यांनी ट्विट करत उत्तर दिलं की, "स्त्रियांच्या चारित्र्यावर टिप्पणी करुन शांत करण्याची तुमची पद्धत ही सगळ्यांनाच माहिती आहे आव्हाडजी… बंद दाराआडच्या गोष्टी ही सगळ्यांना माहिती आहे… टिप्पणी करताना आव्हाडजी विसरू नका लेक तुमच्या घरात ही आहे… बाकी निवडणुकीत धूर दाखवू…"
यावर हे थांबले नाहीत तर अजून अर्वाच भाषेत त्यांनी ट्विट केले आहेत. त्यामुळे आता हे वॉर कधी थांबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.