फुकटातली कोंबडी घ्यायला लोक वरळी नाक्यावर पोहोचले खरे पण...; भाजपच्या 'त्या' बॅनरची राज्यभर चर्चा

फुकटातली कोंबडी घ्यायला लोक वरळी नाक्यावर पोहोचले खरे पण...; भाजपच्या 'त्या' बॅनरची राज्यभर चर्चा

मुंबईः 'सेवा हेच संघटन' असा उल्लेख करुन अमावस्येनिमित्त कोंबडी वाटप करण्यात येणार असल्याचा एक बॅनर मुंबईत झळकला होता. त्या बॅनरवर मोदी-शाह यांच्यासह राज्यातील नेत्यांचे फोटो होते. फ्लेक्सवर भाजपचा स्पष्टपणे उल्लेख केला असला तरी तो बॅनर लावला कुणी, याबद्दल माहिती मिळाली नाही.

मुंबईच्या प्रभादेवीत लागलेल्या भारतीय जनता पक्षाच्या एका बॅनरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. गटारी अमावस्येनिमित्त कोंबडी वाटप, अशा आशयाचा हा बॅनर होता. १५ जुलै सायंकाळी सहा वाजता प्रभादेवी नाका येथे हे कोंबडी वाटप केलं जाणार असल्याचा दावा या बॅनरवर करण्यात आला होता.

फुकटातली कोंबडी घ्यायला लोक वरळी नाक्यावर पोहोचले खरे पण...; भाजपच्या 'त्या' बॅनरची राज्यभर चर्चा
Sanjay Raut : मुंबई गुन्हे शाखेची संजय राऊतांना नोटीस; मुख्यमंत्री कार्यालयाबाबत केलं होतं विधान

एका कोंबड्याच्या चित्रासह भाजपच्या मोदी-शाह-देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर सगळ्या जेष्ठ नेत्यांचे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे फोटो या बॅनरवर झळकले. भाजपच्या ज्या कोणी हा बॅनर लावला होता त्याला बहुदा त्याची चूक आधीच कळली असावी म्हणून शनिवारी सकाळी म्हणजेच कोंबडी वाटपाच्या आधीच बॅनर काढण्यात आला.

फुकटातली कोंबडी घ्यायला लोक वरळी नाक्यावर पोहोचले खरे पण...; भाजपच्या 'त्या' बॅनरची राज्यभर चर्चा
Sakal Survey : गाजावाजा करत महाराष्ट्रात एंट्री! BRS खरंच चमत्कार करणार? सर्व्हेत जनता म्हणते...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बॅनरची शहानिशा करायला म्हणा की मग मोफत कोंबडीच्या आशेने म्हणा काही मंडळी शनिवारी सायंकाळी सहा वाजता वरळी नाका येथे पोहोचलीच. पण दुर्दैवाने त्यांच्या हाती कोंबडीच्या ऐवजी निराशाच आली. कोणा अज्ञाताने खोडसाळपणा म्हणून हा बॅनर लावल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com