esakal | मी काय आहे हे तुमच्या बापाला विचारा, चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यावर पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रा वाघ

मी काय आहे हे तुमच्या बापाला विचारा, चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यावर पलटवार

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू आहे. मी काय आहे आणि काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा. कोल्ह्या-कुत्र्यांना घाबरणारी नाही, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ (bjp leader chitra wagh) यांनी राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख (NCP mahebub shaikh) यांच्यावर पलटवार केला आहे.

हेही वाचा: जो घाबरला तो भाजपमध्ये गेला- मेहबूब शेख

मेहबूब शेख यांनी निलेश लंके यांच्यावर केलेल्या टीकेवरुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला होता. “चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, असं ते म्हणाले होते. पारनेर तालुक्यातील कार्यक्रमात ते बोलले होते. लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्रात ओळख आहे, असाही गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्यावर पलटवार केला आहे. ''वाघावर…कोल्हे कुत्रे भुंकताहेत. कारण मी पीडितांच्या पाठीशी उभी राहते. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले. आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू आहे. मी काय आहे…काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा. कोल्ह्या-कुत्र्यांना घाबरत नाही'', असे रोखठोक उत्तर चित्रा वाघ यांनी दिले.

बाप बदलणाऱ्याच्या बापाला भीत नाही -

दरम्यान, चित्रा वाघ यांनी ट्विट केल्यानंतर परत मेहबुब शेख यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून त्यांना उत्तर दिले आहे. ''आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही. डायलॅागबाजी सोडा आणि आपल्या नवऱ्यावर ५ जून 2016 ला कारवाई झाली तेव्हा सरकार कुणाचं होत ते सांगा? त्यांनी कोणत्या बुद्धीने कारवाई केली होती याचं उत्तर द्या. तुम्ही काय आहात हे आम्ही पाहिले आहे. त्याबाबत कुणालाही विचारायची गरज नाही. जसं आम्ही म्हणतो आमची नार्को टेस्ट करा, तसंच तुम्ही देखील म्हणा माझ्या नवऱ्याची नार्को टेस्ट करा. त्याची भीती कशाला. कोण भुकंतंय हे अख्खा महाराष्ट्र बघतोय. मी बाप बदलणाऱ्यांच्या बापाला भीत नाही'', असे थेट प्रत्युत्तर शेख यांनी दिले.

loading image
go to top