
'खुद की ही आबरू..'; संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर चित्रा वाघ यांचा टोला
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान आज राऊत यांनी भाजप(BJP) च्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याला भाजपच्या नेत्यांकडून जशास तसे उत्तर दिले जात आहे. यातच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राऊत यांच्या त्या 'शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम..' विधानाचा समाचार घेतला आहे.
आजच्या पत्रकार परिषदेच्या आधी राऊत यांनी ईडीचा पर्दाफाश करणार असल्याचे म्हटले होत, त्यानंतर मुंबईत ईडीने धाडसत्र सुरू झाल्यानंतर राऊत यांनी त्यासंबंधी एक सूचक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी राहत इंदौरी यांचा एक शेर 'शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम, आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे!' हा पोस्ट केला होता. आता त्यांच्या या ट्विटला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रिट्विट करत उत्तर दिले आहे.
चित्रा वाघ यांनी राऊत यांना त्यांच्याच शैलीत उत्तर देत एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी 'निकले थे बाजार में दूसरों की इज्जत निकालने.. खुद की ही आबरू सरेआम नीलाम कर बैठे..' असे लिहीले आहे. दरम्यान या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस तसेच यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी आपलं मत व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा: 'आँधी से कहो औकात में रहे', ईडीची छापेमारी सुरू होताच राऊतांचं ट्वीट
दरम्यान संजय राऊत यांनी आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असून खोटे आरोप, बदनाम्या, त्यांचा दबाव, एकतर तुम्ही गुडघे टेका नाहीतर सरकार आम्ही घालवू, अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जात आहेत असे सांगितले. पुढे त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
संजय राऊत यांनी आरोप करताना म्हटलंय की, भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही या सरकारच्या वाटेतून बाजूला व्हा, तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही आम्हाला मदत करा. जर तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईप करतील. त्यानुसार दिल्लीत सिद्धता झाली आहे. तुम्ही मदत केली नाही तर तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा: 'बिल्लीने आज फिर....', राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर अमृतांचं खोचक ट्विट
Web Title: Bjp Chitra Wagh Reply To The Sanjay Raut Tweet Before Todays Press Conference
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..