पंकजा मुंडेंना केंद्रात मोठी जबाबदारी, 'अशी' आहे भाजप कार्यकारिणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची कार्यकारिणी घोषीत करणं बाकी असल्याने ती आज जाहीर करण्यात आली.

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची कार्यकारिणी घोषीत करणं बाकी असल्याने ती आज जाहीर करण्यात आली. अशा प्रकारचे महत्त्वाचे निर्णय घेताना सर्वांशी बोलून निर्णय घ्यायला लागत असल्याने असल्याने कार्यकारिणी जाहीर करण्यास विलंब झाल्याचं त्यांनी सांगितलं. 

कसं आहे भाजपच्या कार्यकारिणीचे स्वरूप : 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीत १२ प्रदेश उपाध्यक्ष, १२ सेक्रेटरी आणि ६ जनरल सेक्रेटरी आणि एक कोषाध्यक्ष  असणार आहेत.   

मोठी बातमी  - कोरोना नाही, जूनमध्ये मुंबई पुण्यातील लोकांनी गुगलवर शोधली 'ही' माहिती..

कोण आहेत १२ भाजप प्रदेश उपाध्यक्ष – 

राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर 

कोण आहेत ६ महामंत्री – 
सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक

भाजप पक्ष कार्यकारिणीसोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याची 18 प्रकोष्ठ म्हणजेच वेगवेगळ्या विषयांचे प्रमुख, भाजपचे प्रदेश कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख देखील घोषित केलेत. भाजप कार्यकारिणीमध्ये 69 सदस्य असतील. सोबतच 139 निमंत्रित सदस्य असणार आहेत. याशिवाय सर्व भाजप खासदार आणि आमदार हे कायम स्वरूपी सदस्य असतात असं देखील पाटील म्हणालेत. राज्याच्या सर्व सामाजिक स्तरांचा आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणालेत. 

मोठी बातमी पोलिसांना लागली टीप, काही दिवस लक्ष ठेऊन मारला छापा आणि हाती लागलं ६० लाखांचं घबाड...

खडसे मुंडे यांना स्थान नाही, बावनकुळेमात्र यादीत : 

या कार्यकारिणीत पंकजा मुंडे यांना विशेष निमंत्रित म्हणून स्थान दिलं गेलंय. खासदार प्रीतम मुंडें देखील यामध्ये आज जाहीर केलेल्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आलाय.  रक्षा खडसे यांनाही या यादीत स्थान दिलं गेलंय. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे त्यांना जबाबदारी दिली असं नाही, हेही स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. केंद्रात पंकजा मुंडे यांना स्थान मिळेल आणि सोबतच महाराष्ट्राच्या कोअर कमिटी अशी भूमिका त्यांना मिळेल असं देखील चंद्रकांत पाटील म्हणालेत. 

bjp declares list of maharashtra BJP executive committee read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp declares list of maharashtra BJP executive committee read full news