esakal | पोलिसांना लागली टीप, काही दिवस लक्ष ठेऊन मारला छापा आणि हाती लागलं ६० लाखांचं घबाड...
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांना लागली टीप, काही दिवस लक्ष ठेऊन मारला छापा आणि हाती लागलं ६० लाखांचं घबाड...

"साहेब गांजा आंध्र और हेरॉईन राजस्थान से आता हैं" शेखची कबुली 

पोलिसांना लागली टीप, काही दिवस लक्ष ठेऊन मारला छापा आणि हाती लागलं ६० लाखांचं घबाड...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कठोर असे नियम पाळले जातायत. मुंबईलगतच्या मोठ्या शहरांमध्ये म्हणजे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. असा संवेशनशील परिस्थितीचा गुन्हेगार मात्र फायदा उचलताना पाहायला मिळतायत. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्यांमधून भल्या मोठ्या प्रमाणात गांज्याची आणि हेरॉईनची ने आण करण्यात येतेय. मुंबईतील गुन्हे शाखेच्या अँटॉप हिल कक्षाने या सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्यात.या सराईत गुन्हेगारांकडून तब्बल ६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.       

कोरोनावरील सर्वात प्रभावी अशा 'टॉसिलीझुमॅब'चा तुटवडा, परिणाम होंतोय नवी मुंबई ठाण्यातील रुग्णांवर...

कसा रचला सापळा : 

मुंबईतील ट्रॉमबे परिसरातील चिता कॅम्प भागातील शेख अमली पदार्थांची लॉकडाऊनमध्ये विक्री करत असल्याची टीप गुन्हे शाखेच्या कृष्ण नार्वेकर यांना मिळाली होती. यानंतर पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांच्या सूचनेनुसार एका पथकाने शेखवर नजर ठेवण्यास सुरवात केली. तो कुठे जातो काय करतो या सर्वांवर नजर ठेवली जात होती. भरवशाची टीप मिळताच पोलिसांनी शेखच्या घरावर छापा मारला आणि तब्बल दोन किलो गांजा आणि ३०० ग्राम हेरॉईन जप्त केलंय. 

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ! मुंबईकरांनो हवामान खातं म्हणतंय....

कुठून यायचा सप्लाय ? 

अली महोम्मद शफी आलम शेख असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. तो ६० वर्षांचा आहे. राजस्थानातून येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्यांमधून हेरॉईन तर आंध्रामधून गांजा मुंबईत आणला जात होता माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. शेख विरोधात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीच्या गुन्हांची नोंद आहे.  

mumbai police raids ali mohammad shafi aalam sheikhs house and seized