कोरोना नाही, जूनमध्ये मुंबई पुण्यातील लोकांनी गुगलवर शोधली 'ही' माहिती..

कोरोना नाही, जूनमध्ये मुंबई पुण्यातील लोकांनी गुगलवर शोधली 'ही' माहिती..

मुंबई : गुगलवर लोकं काय सर्च करतात यावर लोकांचा मूड काय, एखाद्या शहराचा किंवा अगदी देशाचा मूड काय आहे हे समजतं. ट्विटर ट्रेंड्स, फेसबुक ट्रेंड्स आणि गुगल ट्रेंड्स यावर सातत्याने माहिती सर्च केली जाते आणि लोक आपले विचार मांडून व्यक्त होत असतात. सध्या कोरोनाचा संवेदनशील काळ सुरु आहे. अशात तुम्हाला वाटत असेल की लोकं केवळ कोरोनाबद्दल शोध घेतायत, सर्च करतायत. मात्र तसं नाहीये.  सध्या लोकांचा मूड काय आहे, लोकं काय सर्च करतायत याबाबत गुगलच्या सर्च ट्रेंडच्या माध्यमातून खुलासा झालाय. 

काय सर्च केलं गेलंय गुगलवर : 

खरंतर एप्रिल आणि मे महिन्यात लोकं घरी होती. सर्वांच्या मनात कोरोनाची मोठी भीती होती, अजूनही आहे. मात्र आता हळूहळू लोकं करोनासोबत जगायला शिकतायत. नियमांचं पालन करायला शिकतायत. एप्रिल आणि मे महिन्यात गुगलवर कोरोना कधी संपणार, भारतात कोरोनाचं औषध कधी येणार, आणि कोरोनाबद्दल मोठ्या प्रमाणात सर्च केला गेला. मात्र जून महिन्यात हा सर्च कमी झालेला पाहायला मिळाला. जून महिन्यात  लोकांनी मुंबईत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केलेल्या आत्महत्येवर सर्च केलेला पाहायला मिळालंय. 

गुगल ट्रेंड्सच्या आकडेवारीत कोरोना व्हायरस बाबतच्या सर्च ट्रेंडमध्ये ६६ टक्के घट झालेली पाहायला मिळाली. कोरोना व्हायरस ऐवजी लोकांनी सुशांत सिंग राजपूतला सर्वाधिक सर्च केलं. सुशांत सिंग राजपूत सोबतच आणखी काही वेगळ्या गोष्टी देखील लोकांनी सर्च केल्याचं आढळून आलंय. यामध्ये दुसरा नंबर लागलाय तो म्हणजे सूर्यग्रहणाचा आणि त्या मागोमाग तिसरा नंबर लागतोय तो 'फादर्स डे' चा.   

कोरोनाच्या लसीबाबत चर्चा तर होणारंच 

कोरोनाची भीती लोकांच्या मनात आहेच. लोकं कोरोनासोबत जगायला शिकत जरी असलेत तरीही कोरोनावर लस कधी येणार याचीही लोकं वाट पाहतायत. जूनमध्ये आधीच्या महिन्यांच्या तुलनेत कोरोनाबाबत सर्च कमी जरी झाला असला तरीही 'कोरोनाव्हायरस न्यूज' अव्वल ट्रेंडिंग होतं. लोकं भारतात कोरोनाची लस कधी येणार याचा सर्च करतायत. 

google trends for the moth of june people searched for sushant singh solar eclipse and fathers day

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com