Nawab Malik: नबाव मलिकांसारखा न्याय प्रफुल्ल पटेलांना का नाही? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरुन विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
bjp devendra fadanvis said why is there different justice to other leader than nawab malik praful patel
bjp devendra fadanvis said why is there different justice to other leader than nawab malik praful patel

मुंबई- नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरुन विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. जो न्याय नवाब मलिकांना आहे. त्यांच्यासारखे आरोप, त्यांच्या सारखा तुरुंगवास , त्यांच्यासारखी परिस्थिती कोणावरही असेल तर त्याच्यावर तोच न्याय लागला पाहिजे हे आम्ही पाहू, असं फडणवीस म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय तो भारताचा विजय आहे. जम्मू काश्मीर विकासाचे ठिकाण होण्याऐवजी दहशतवाद्याचं घरं बनलं होतं. आता जम्मू-काश्मीर दहशताद मुक्त होत आहे. आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे, असं फडणवीस म्हणाले.

bjp devendra fadanvis said why is there different justice to other leader than nawab malik praful patel
दाऊदचा जावई कोण? नवाब मलिक प्रकरणावरून 'या' बड्या नेत्याची फडणवीसांवर टीका

जम्मू-काश्मीरात दहशतवादाच्या घटना कमी झाल्या आहेत. पर्यटनाच्या वाढीमुळे तरुणांना रोजगार मिळू लागला आहे. काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. भारताच्या एकता आणि अखंडतेबाबत ज्यांच्या मनात प्रश्न होते. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे सर्व शंका संपुष्टात आल्या आहेत, असंही ते म्हणाले.

bjp devendra fadanvis said why is there different justice to other leader than nawab malik praful patel
'नकाब'चा जवाब द्यावा लागेल', नवाब मलिकांच्या वादात आता मनसेची उडी

पाक व्याप्त काश्मीरबाबतही काही निर्णय होऊ शकतो. असंभव वाटणाऱ्या गोष्टी मोदींनी शक्य केल्या आहेत. त्यामुळे येत्या काळाची आपण वाट पाहू. बाळासाहेब यांनी कलम ३७० हटवण्याची मागणी केली होती. त्यांची मागणी पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केलं.

पंतप्रधान मोदी जेव्हा हे काम करत होते त्यावेळी ठाकरेंची शिवसेना ही राज्यसभेत वेगळी आणि लोकसभेत वेगळी भूमिका घेत होती. त्यामुळे त्यांना या संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

बाळासाहेबांची जी भूमिका होती. त्यापेक्षा वेगळी भूमिका घेणाऱ्या लोकांच्या भूमिकेला त्यांनी साथ दिली आहे, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावर टीका केली. शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना दोनवेळा कांदा निर्यात बंदी केली होती, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com