अजितदादा बऱ्याच गोष्टी सोईस्कर विसरतात; फडणवीसांचे टीकेला प्रत्युत्तर

BJP Devendra fadnavis takes jibe on ncp leader ajit pawar on cabinet expansion
BJP Devendra fadnavis takes jibe on ncp leader ajit pawar on cabinet expansion e sakal

राज्यात मंत्रीमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे, यादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या घोषणेचा पुनरुच्चार केला. मात्र, त्यासाठी त्यांनी कोणतीही तारीख सांगीतलेली नाही. रविवारी नवी दिल्लीत एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराचा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.

अजित पवार काय म्हणाले होते?

शिंदे-फडणवीस जोडीला दिल्लीतून हिरवा कंदील न मिळाल्याने महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याचे अजित पवार म्हणाले होते. मंत्रिमंडळ विस्तार आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंत्रिपदाची नियुक्ती करण्याची मागणी आम्ही सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे करत आहोत. राज्यातील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांचे प्रश्नही डोके वर काढत आहेत. मात्र जोपर्यंत दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे ते म्हणाले होते.

BJP Devendra fadnavis takes jibe on ncp leader ajit pawar on cabinet expansion
दौरा CM शिंदेंचा अन् विकेट नांदेड शिवसेना जिल्हा प्रमुखांची

फडणवीसांचं उत्तर...

अजित पवारांच्या या टोमण्यांना उत्तर देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना हे सर्व बोलावेच लागेल. अजितदादा स्वेच्छेने विसरतात की ते सरकारमध्ये असताना पहिले 32 दिवस फक्त पाच मंत्री होते. उद्धव ठाकरे सरकारच्या पहिल्या एका महिन्यात अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

BJP Devendra fadnavis takes jibe on ncp leader ajit pawar on cabinet expansion
..म्हणून शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र ठरतील; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?

मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखांवर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी विधाने केली आहेत. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी रविवारपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी सांगितले की, 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळात नवीन सदस्यांचा समावेश केला जाईल, जेणेकरून मंत्र्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या भागात तिरंगा फडकवता येईल. दरम्यान, महाराष्ट्रात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस गृहखाते स्वत:कडे ठेवू शकतात, असा दावा वृत्तांत करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com