दौरा CM शिंदेंचा अन् विकेट नांदेड शिवसेना जिल्हा प्रमुखांची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray vs Eknath Shinde

दौरा CM शिंदेंचा अन् विकेट नांदेड शिवसेना जिल्हा प्रमुखांची

मुंबई : शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रविवारी पक्षाचे नांदेड जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांची पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल हकालपट्टी केली आहे. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने ही माहिती दिली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नांदेडच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच शिवसेनेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अर्थात शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेत विकेट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Shivsena news in Marathi)

हेही वाचा: Uday Samant : कात्रज चौकात होणार उदय सामंत यांची सभा, जाहीर सत्कार

शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, ठाकरे यांनी मुंडे यांच्या पक्षविरोधी कारवाया पाहता त्यांना पक्षाच्या नांदेड जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेतील अनेक नेते त्यांच्या गटात सामील होत आहे. शिवसेनेचे अनेक खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत.

दरम्यान आता शिवसेना कोणाची असा वाद निर्माण झाला आहे. हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आहे. तर सर्वोच्च न्यायालयात देखील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांच्या याचिका प्रलंबित आहे. यावर १२ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. याआधीच सर्वोच्च न्यायालयात चार सुनावण्या झाल्या असून अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.

हेही वाचा: Friends Forever; ... अमृता फडणवीसांच्या ट्वीटची चर्चा

जूनमध्ये, शिंदे आणि इतर 39 सेनेच्या आमदारांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड केले होते, ज्यामुळे ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकार कोसळले होते, ज्यामध्ये सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा समावेश होता.

Web Title: Uddhav Thackeray Sacks Senas Nanded Chief Ahead Of Maharashtra Chief Ministers Visit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..